Deepak Kesarkar : म्हणूनच 50 आमदार फुटले ! ; ठाकरेंना केसरकरांचे प्रत्युत्तर

Deepak Kesarkar : निर्दयी सरकार कसं असतं हे यापूर्वीच्या सरकारकडे बघून लोकांना समजलं आहे.

deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News
deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News sarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar : ‘आले रे आले ५० खोके'. '५० खोके, एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात '५० खोके' हा शब्द प्रचलित झाला आहे. (Deepak Kesarkar news update)

शिंदे गटातील प्रत्येक आमदारांना '५० खोके, एकदम ओके’असे म्हणून विरोधक डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. '५० खोके 'घेऊन ५० आमदार फुटले अशी टीका आघाडीतील नेते करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर ५० आमदार का फुटले, यावर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी खुलासा केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी शिंदे गटावर टीका केली होती. त्या टीकेला केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदार दीपक केसरकर म्हणाले, "दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार फुटले का? दगडाला त्यावेळी पाझर फुटला असता तर सध्या भेटी जरी दिल्या असत्या, लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली असती, लोकांना न्याय दिला असता, तर पक्षांमध्ये बंड का झालं असतं? मग पाझर कोणाला फुटत नाही,"

रविवारी औरंगाबाद येथील दौऱ्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी म्हणून एक व्हा. आसूड माझ्याकडे नाही, तुमच्याकडेच ठेवा. तो वापरा. शेतकऱ्यांच्याच हातात आसूड शोभून दिसतो. शेतीच्या अवजारांनी तुम्ही मातीलही कोंब फोडता मग सरकारला पाझर का नाही फोडू शकत. पाझरच नाही तर घाम फोडला पाहिजे," यावरून केसरकरांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


deepak kesarkar,eknath shinde, uddhav thackeray Latest News
Devendra Bhuyar : 'तलवारीने हात छाटू,' म्हणणारे राष्ट्रवादीचे आमदार भुयार अडचणीत ; काँग्रेस आक्रमक

"मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी किती लोकांना त्यांनी 50 हजार रुपये नुकसान भरपाई दिली हे जाहीर करावं. तुम्ही जेवढे दिले त्याच्या दुप्पट आम्ही कमी वेळात पैसे शेतकऱ्यांना दिले.तुम्ही फक्त बोलता आम्ही करून दाखवतो," असा टोला केसरकरांनी ठाकरेंना हाणला.

"निर्दयी सरकार कसं असतं हे यापूर्वीच्या सरकारकडे बघून लोकांना समजलं आहे. आयुष्यात यांनी कधीही पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना थेट दिले नाहीत,"असा आरोप केसरकर यांनी यावेळी केला.

ही खूप मोठी गोष्ट

"अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या दारावर कधी जाऊ शकले नाहीत. मात्र आज शेतकऱ्यांच्या दारावर गेले याचा मला आनंद आहे. आम्ही उठाव केल्यानंतर यांना शेतकऱ्यांची आठवण झाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांना आज शेतकऱ्यांकडे जाण्याची संधी मिळाली ती सुद्धा आमच्यामुळेच मिळाली," असा थेट हल्लाबोल केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com