Kalyan Lok Sabha Election: श्रीकांत शिंदेंचे नाव निश्चित? उमेदवारी जाहीर होण्याआधीच विजयाचा संकल्प

Kalyan Lok Sabha Election 2024: एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांनी आपण मागील वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे शिंदेंची उमेदवारी निश्चित होणार असल्याच्या चर्चां सुरू झाल्या आहेत.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील काही जागांबाबत महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांना डावललं जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांनी आपण मागील वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदेंची उमेदवारी निश्चित होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

महायुतीत मित्रपक्ष म्हणून असणाऱ्या शिंदे गटाने लोकसभेसाठीच्या आपल्या पहिल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव नसल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय भाजपचाच (BJP) या जागेवर दावा असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. या चर्चा सुरू असताना आणि कल्याण लोकसभेचा उमेदवार निश्चित झाला नसतानाच शिंदे यांनी आपण या जागेवरुन मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार कोण असणार, यासाठी ठाकरे गटाची अजूनही चाचपणी सुरू असल्याचे बोललं जात आहे. ठाकरे गट येथे शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार देऊन मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरुनच शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांनी समोर कोणीही उमेदवार आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्ध तीने लढणार आणि गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांच्या शिवसेना (Shivsena) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत. सोमवारी डोंबिवलीतील ब्राह्मण सभागृहातील बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी निवडणुकी संदर्भात विविध सूचना केल्या. आपण केलेली विकासकामं लोकांपर्यंत कशी पोहोचायची, मतदारांपर्यंत कसं पोहोचायचे, निवडणूक यंत्रणा कशी राबवायचे, याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

Shrikant Shinde
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिंदे शब्द पाळणार की उमेदवार बदलणार?

दरम्यान, महायुतीचा उमेदवार म्हणून खासदार शिंदे यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही, तर महाविकास आघाडीच्या ठाकरे गटानेही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे शिंदे यांच्या विरोधातली उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या ठिकाणी कोणीही उमेदवार आला तरी आपण मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार असा दावा शिंदे यांनी केला आहे.

Shrikant Shinde
Ashish Shelar : 'रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?' आशिष शेलारांचा काँग्रेसवर हल्लाबोल

श्रीकांत शिंदे म्हणाले, गेली 10 वर्षे खासदार म्हणून या मतदारसंघात लोकांच्या सहकार्याने विश्वासाने काम केलं आहे. इथे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे समोर ठेवून निवडणुकीची तयारी करत आहोत. विरोधकांना या जागेवर कोणी ना कोणी उमेदवार द्यावा लागणारच आहे. मात्र, त्यांचा उमेदवार कोण असेल याचा विचार न करता आपण केलेली कामे लोकांपर्यंत कशी जातील, यासाठी आमच्या या बैठका सुरू आहेत. उमेदवार कोणी आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढणार. 2019 च्या निवडणुकीत साडेतीन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो. मात्र यंदा त्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचंही शिंदे म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com