Ashish Shelar : 'रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?' आशिष शेलारांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Ashish Shelar tweet on congress : आशिष शेलार यांनी एक कविता एक्सवर शेअर करत काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे.
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप आणि हेवे दावे करण्यात येत आहेत. सोशल माध्यमांवरील विविध पोस्ट, रील्स यावरून प्रचाराला सुरुवात झाली आहे. यातच आता मुंबई भाजपचे अध्यक्ष (President BJP Mumbai) आमदार आशिष शेलार 'एकापाठोपाठ भ्रष्टाचारी चालले जेलात...रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?' असे म्हणत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Ashish Shelar
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिंदे शब्द पाळणार की उमेदवार बदलणार?

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी राजकारणी सोशल मीडियाचा वापर करतात. अनेकदा आपली, पक्षाची भूमिका लोकांमध्ये थेट पोहाेचवण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होतात. त्यातच आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक कविता एक्सवर शेअर केली आहे. "रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?" असे म्हणत आशिष शेलार यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकापाठोपाठ भ्रष्टाचारी चालले जेलात...

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

बियर, व्हिस्की, वाइन पेग रिचवले..

आता यांचे पाय अडकले खोलात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

हिंदुहृदयसम्राटांनी ज्या हाताला फटकारले..

बाप-बेटे अडकले त्याच भ्रष्टाचारी "हाता"च्या गोलात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

पाणी, जमीन, कोळसा, आसमान खाल्ले..

देश केला उद्ध्वस्त भ्रष्टाचाराच्या या झोलात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी...

एकाच परिवाराचा "हात" लुटमारीच्या या मेल्यात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

पक्ष कोमात, फक्त जाहिरात मात्र जोमात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

R

Ashish Shelar
Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिंदे गट आशावादी; नारायण राणेंची भूमिका आज ठरणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com