Mumbai, 2 April : महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या आठ जागांपैकी दोन जागांवरील उमेदवार बदलण्यात यावेत, यासाठी भाजपकडून शिंदे यांच्यावर प्रचंड दबाव असल्याची माहिती आहे. त्यासाठी भाजपकडून अंतर्गत सर्व्हेचा दाखला दिला जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे भाजपच्या दबावाला बळी पडून उमेदवार बदलणार की विद्यमान खासदारांना दिलेला शब्द पाळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला (Shivsena) कमी जागा देण्याची चर्चा होती. तसेच, शिवसेनेने आपले उमेदवार बदलावेत, यासाठी भाजपचा आग्रह होता. मात्र, बंडाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोबत आलेले आमदार आणि खासदार यांना पुन्हा तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मोठी अडचण झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर ठाम राहत विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यात रामटेक- राजू पारवे, बुलडाणा- प्रतापराव जाधव, मावळ- श्रीरंग बारणे, शिर्डी- सदाशिव लोखंडे, हिंगोली- हेमंत पाटील, दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, कोल्हापूर- संजय मंडलिक, हातकणंगले- धैर्यशील माने यांचा समावेश होता.
भाजपकडून कोल्हापूर, हातकणंगले, हिंगोली या मतदारसंघांतील विद्यमान खासदार बदलावेत, अशी सूचना केली होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, हिंगोली आणि हातकणंगले मतदारसंघातील भाजपकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील आणि धैर्यशील माने यांना कडाडून विरोध करताना प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हातकणंगले आणि हिंगोलीतील उमेदवार बदलण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपकडून दबाव टाकला जात आहे, अशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
दरम्यान, भाजपकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्व्हेचा हवाला देऊन शिंदे यांच्याकडे उमेदवार बदलण्याचा आग्रह होत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या दबावाला बळी पडून उमेदवार बदलणार की, बंडाच्या वेळी दिलेला शब्द पाळून विद्यमान खासदारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार हे पाहावे लागेल.
संजय शिरसाटांचे संकेत
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी एखाद दुसरा उमेदवार बदलण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्र्यांना उमेदवार बदलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद दुसरा उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो उमेदवार पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील असू शकतो. कारण या दोनच विभागातील उमेदवार जाहीर झाले आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.