

मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. हाजीअली ते वरळी दरम्यान असलेल्या बोगद्यातून जात असताना एका कारला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण वाहन आगीच्या विळख्यात सापडले. या घटनेमुळे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दुपारी सुमारे 12.25 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच वाहन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही क्षणांतच वाहनाला आग लागली आणि ती वेगाने पसरत गेली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून वाहनातील प्रवाशांनी तत्काळ बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र बोगद्यात दाट धूर साचल्याने बचाव आणि आग विझवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले.
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक वाहनचालकांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. काही ठिकाणी पर्यायी मार्गांकडे वाहनांचे वळविण्यात आले.
या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यामध्ये कार पूर्णपणे जळताना आणि बोगद्यात धुराचे प्रचंड लोट पसरल्याचे दिसत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, कारला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, शॉर्टसर्किट किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही घटना घडली याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.