Devendra Fadnavis On Opposition meeting :  Uddhav Thackeray
Devendra Fadnavis On Opposition meeting : Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray : मेहबूबा मुफ्ती यांच्याशेजारी बसण्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण..

Patna Opposition Meeting : मुफ्तींना मोदींनी ३७० कलम हटविणार नाही, असे वचन दिले होते.
Published on

Patna News : विरोधी पक्षांची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीला देशातील 15 विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. यात जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती देखील आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे हे बसलेले पाहायला मिळाले. यावरुन भाजपने ठाकरेंवर टीका केली आहे.

आपण मुफ्तींच्या शेजारी का बसलो याचं कारण शनिवारी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज (शनिवारी) दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

Devendra Fadnavis On Opposition meeting :  Uddhav Thackeray
Fadnavis Vs Thackeray : तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही ; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार ; बघूच आता..

"काल मी पाटण्याला गेलो होतो तिथे बघितलं मेहबुबा मुफ्ती आहेत. मुद्दामून मी त्यांच्या बाजूलाच जाऊन बसलो. कारण आता काय त्या भाजपबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर स्वच्छ झालेल्या आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या बाजूला बसल्याने आपणही स्वच्छ होऊ," असे म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. मुफ्तींच्या शेजारी बसल्याने ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना ठाकरेंनी सुनावलं. यावेळी ठाकरेंनी मुफ्तींसोबतचे नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे फोटो दाखवले.

Devendra Fadnavis On Opposition meeting :  Uddhav Thackeray
Ahmednagar News : गुन्हेगारी रोखण्यासाठी भाजप खासदार मैदानात ; अहमदनगरमध्ये..

पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्याशेजारी बसून उद्धव ठाकरे हे युतीच्या चर्चा करीत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे. त्यांच्या या टोमण्याला उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. तर त्यांनी विरोधकांच्या बैठकीत मुफ्तींच्या शेजारी बसण्याचे कारण देखील सांगितले आहे.

"मी मुफ्तींचा बाजूला मुद्दाम बसलो होतो. मुफ्तींना मोदींनी ३७० कलम हटविणार नाही, असे वचन दिले होते. त्यामुळे मुफ्ती यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. पण मोदींनी ते आश्वासन पाळलं नाही. ३७० कलम त्यांनी हटवलं. मिळेल तिथं खा, ही आमची परंपरा नाही," अशा शब्दात ठाकरेंनी भाजप नेत्यांना सुनावलं. काश्मिरमध्ये अजूनही निवडणुका का घेतल्या जात नाही, असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com