मुंबई : भाजपच्या प्रसाद लाड (Prasad Lad) यांना हरविण्यासाठी एकेक मत गोळा करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) यांची शिवसेना (Shivsena) नेतृत्वाकडून आशा वाढली आहे. शिवसेनेकडे त्यांच्या २ उमेदवारांसाठी लागणारी किमान मत असून ३ मत अतिरीक्त आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेवेळी थेट शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या अर्धा झडन अपक्ष आमदारांची मते मिळविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून (Uddhav Thackeray) सेनेच्या बड्या नेत्यांना भाई राजी करीत आहेत.
मात्र विरोधकांसोबतच मित्रपक्षांपासूनही थोडेसे फटकून राहण्याचा पवित्रा घेतलेल्या शिवसेनेनी भाईंना अजूनही 'वेटिंग' वर ठेवले आहे. त्यामुळे भाईंवर शिवसेना उदार होणार का, याची उत्सुकता आहे. (Vidhan Parishad Election Latest News)
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जोर लावला आहे. परंतु ज्या दोघांमुळे म्हणजे, भाई आणि लाड यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक होत आहेत; त्याच दोघांमधील लढतीने निवडणुकीचा माहोल गरम केला आहे. या पाचव्या जागेवरचा भाजपचा उमेदवार निवडून आणण्याकरिता लाड यांना २२ मते जुळवावी लागणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या भाईंना दहा मतांची बांधणी करायची आहे.
या निवडणुकीत लाड यांच्या तुलनेत भाईना आपल्या विजयाचा मार्ग जवळ वाटतो आहे; परंतु, दहा मते काँग्रेसकडे झुकणे तुर्तस अवघडच आहे. मात्र, भाईच्या साथीला शिवसेनेकडे शिल्लक राहणारी मते विशेष करून अपक्ष आमदार धावून आले, तर लाडांना धोका होऊ शकतो, असे मानले जात आहे. आधीच पक्षांतर्गत गटातटाने हेरेलेल्या भाईंना पुन्हा आमदार व्हायचेच आहे. त्यासाठी भाईंपुढे शिवसेनेचा आधार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. (Bhai Jagtap Vidhan Parishad Election Latest News)
त्याचाच भाग म्हणून शिवसेनेतील काही बड्या नेत्यांचे वजन वापरून भाई हे ठाकरेंचे मन जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भाई गेल्या काही दिवसांपासून पक्षातील मते शाबूत ठेवण्यापासून बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकुर यांच्या भेटीला गेला. त्यादरम्यान अन्य अपक्षांच्याही ते गाठीभेटी घेत आहेत. मतदानासाठी काही तास उरले असल्याने भाईंनी आपले सारे लक्ष वर्षाकडे म्हणजे, ठाकरेंच्या भूमिकेकडे वळवले आहे. परिणामी, भाईंच्या आमदारकीचा फैसला शिवसेना नेतृत्वाच्या हाती सल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.