Mumbai News : धारावी पुनर्विकास प्रकल्पाखाली महायुती सरकराने देवनारच्या डंपिंग ग्राऊंडची 125 एकर जागा अदानींना दिली. धारावीकरांना पुनर्विकासाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडमध्ये पाठवणार आहे.
महायुती सरकारच्या या निर्णयावर महाविकास आघाडी तुटून पडली आहे. काँग्रेसने भ्रष्ट युती धारावीकरांना डंपिंग ग्राऊंडमध्ये पाठवणार, असा टोला लगावला आहे.
महायुती सरकारने (Mahayuti) गेल्या महिन्यात कॅबिनेट बैठका घेत, धडाधड निर्णय घेतले. निवडणुकीच्या तोंडावर सर्वच घटकांना खूश करण्याचा निर्णय घेतले. या निर्णयात काही संवेदनशील निर्णय देखील झालेत. यावरून विरोधकांनी रान उठवलं आहे. धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी दोन दिवसांपूर्वीच सरकारने बोरिवली, मालवणीत जागा दिली. तसंच धारावीतील लाखो रहिवाशांना अपात्र ठरवून धारावीबाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने त्यांच्या पुनर्वसनानिमित्ताने अदानींना मुंबईतील इतर ठिकाणचे भूखंड दिले जात आहेत. धारावीकरांना डम्प करण्यासाठी महायुती सरकारने देवनार डंपिंग ग्राऊंडची जागा अदानींना दिली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवनारच्या डंपिंग ग्राऊंडची 125 एकर जागाही अदानींना देण्यात आली. महायुती सरकारच्या या निर्णयावर धारावीकरांचा संताप उठला आहे. यावर काँग्रेसने महायुती सरकारला चांगलेच टार्गेट केलं आहे. काँग्रेसने (Congress) या निर्णयावर संताप व्यक्त केला. देवनारमधील 125 एकर जागा धारावीकरांसाठी देऊन भ्रष्ट युतीने आपण जनेतला कचरा समजते, हे सिद्ध केलं आहे. पण कचरा जनता नाही, तुम्ही आहात मिंधे सरकार, निवडणुकीत उडून जाताल, असा निशाणा काँग्रेसने साधला आहे.
महायुती सरकारच्या या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. धारावीकरांच्या पाठिशी शिवसेना ठाम उभी आहे. धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे, अशी धारावीकरांची मागणी आहे. त्याला शिवसेनेला ठाम पाठिंबा असून, धारावीकरांना तिथल्या तिथे घरे देता येईतील. पोलिस, वांद्रे वसाहतीमधईल रहिवाशी आणि मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसालाही धारावीतच घरे देता येतील, अशी शिवसेनेची भूमिका आहे.
महायुती सरकार अदानींना मुंबईतील अनेक ठिकाणचे भूखंड वाटत आहे. महायुतीच्या धारावीतील निर्णयानंतर अदानी समूहाने संपूर्ण धारावीत बॅनरबाजी सुरू केली आहे. धारावीतील सर्व पात्र झोपडीधारकांना धारावीतच पुनर्वसित केले जाईल, अशी ही बॅनरबाजी आहे. अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने हे बॅनर लावले आहेत. पात्र झोपडीधारकांचे धारावीतच पुनर्वसन, मग अपात्र ठरवून किती जणांना धारावीबाहेर काढणार, याचेही उत्तर द्या, अशी मागणी धारावीकरांकडून होऊ लागली आहे.
धारावी हा मुंबईचा मध्यवर्ती भाग आहे. ही जागा अत्यंत मोक्याच्या असून, त्यावर नागरी वस्ती वसली आहे. धारावीची जागा हजारो एकर असून, मुंबईत एकाच ठिकाणी इतकी मोठी जागा मिळणे ही अशक्य, असे आहे. अदानी समूहाने मुंबईसह धारावीत अधिक रस घेतला आहे. मुंबईतल्या मोक्याच्या जमिनीही अदानींना महायुती सरकारकडून मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.