Uddhav Thackeray Video : उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी, गिरगावमधील रुग्णालयात उपचार

Uddhav Thackeray Shivsena angioplasty : शिवसेना (यूबीटी) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : शिवसेना (यूबीटी) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहेत. ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

उद्धव ठाकरेंना उद्या सकाळी 11 वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे.

दोन दिवसांपासून उद्धव ठाकरेंना त्रास होत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे रुटीन चेकअपसाठी ते रुग्णालयात दाखल झाले असल्याचे सांगण्यात येत होते. ठाकरेंच्या चेकअप दरम्यान ब्लॅकेज आढळल्याने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray
Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, सावत्र भावांना जागा दाखवा: फडणवीसांचा विरोधकांना चिमटा

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना 12 नोव्हेंबर 2021 मध्ये देखील रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपल्यावरील या किचकट शस्त्रक्रियेबाबत जनतेशी संवाद साधताना माहिती दिली होती. तर, 2012 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली करत त्याच्या धमन्यांमधील ब्लॉकेजेस यशस्वीरित्या काढण्यात आले होते.

Uddhav Thackeray
Sunil Kedar : नागपूर जिल्ह्यातील ठाकरे, पवारांचे उमेदवार सुनील केदार ठरवणार? स्थानिक नेते धास्तावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com