
Mumbai municipal election update : मुंबईतील काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई महापालिका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढावी, असं विधान केलं आहे. या विधानानंतर मुंबईत आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यावर 'रिप्लाय' येत असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काहीसा भाई जगतापांच्या सुरात सूर मिसळल्याचं समोर येताना दिसत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी भाई जगतापांची बाजू घेताना, त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका मांडली असून, यावर पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असे म्हटलं आहे.
काँग्रेस (Congress) नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा इथं यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "मुंबईतील अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आणि भावना आहे. तीच भावना भाई जगताप यांनी बोलून दाखवली आहे. मात्र यथावकाश पक्ष यावर निर्णय घेईल."
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. मुंबई (Mumbai) महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्ष अन् मनसे युती होईल, असे संकेत मिळत आहे. आतापर्यंत ठाकरे बंधूंच्या सहा-सात भेटी झाल्या आहेत. परंतु दोघा बंधूंकडून युतीबाबत स्पष्ट संकेत नाहीत. तोच हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला आघाडी घेण्यावरून, महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नसल्याचे म्हटले आहेत.
यातच, भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूच काय, आघाडीत देखील लढणार नाही, असे विधान केले. राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे या दोघांबरोबरही काँग्रेस लढणार नाही, असे सांगताना काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळाचे संकेत दिले आहेत. भाई जगताप यांच्या या भूमिकेवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. याबाबतचा निर्णय पक्षाचे नेतृत्व घेईल, म्हटले आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल आता कधीही वाजू शकतो. त्या तोंडावर महाविकास आघाडीतील धुसफूस उघड होऊ लागली आहे. ठाकरे बंधूंची युतीवर, मनसे आघाडीत येण्यावरून काँग्रेसमध्ये उत्साह दिसत नाही. राज ठाकरे आघाडीत आल्यास त्याचा थेट परिणाम हिंदी भाषिक मतदारांवर होईल. तो मतदार आघाडीपासून दुरावेल, अशी भीती काँग्रेसला वाटतो. यातूनच ही वात पेटवली गेल्याची चर्चा आहे.
भाई जगताप यांनी जरी ही वात पेटवली असली, तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाई जगतापांना वेळीची समज देण्याऐवजी प्रत्यक्षपणे त्यांची बाजू घेतल्याचे दिसते. यावरून सपकाळ भाई जगताप यांच्या भूमिकेला हवा देत आहे, अशी चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट 'डंके की चोट' पर सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली, त्यामध्येही मी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच गोष्टी सांगितली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.
या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढूयात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.