उद्धव ठाकरेंची ताकद किती? हे भाजपला कळलंय; म्हणून ते मनसेला सोबत घेताहेत!

“महाविकास आघाडीत सध्या अतिशय उत्तम वातावरण आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे"
Raj Thackeray, Amit Shaha, Udhhav Thackeray
Raj Thackeray, Amit Shaha, Udhhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Varun Sardesai On MNS-BJP Alliance : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अशातच आता भाजपकडून राज ठाकरेंना महायुतीत सामील करून घेण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपला आता उद्धव ठाकरेंची ताकद कळून चुकली असल्याचं वक्तव्य ठाकरेंच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना सरदेसाई (Varun Sardesai) म्हणाले, “महाविकास आघाडीत सध्या अतिशय उत्तम वातावरण आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोण कोणाशी युती करते यापेक्षा आमची ताकद कशी वाढेल यावर आमचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपसोबत असताना त्यांना कोणाची गरज पडली नाही. मात्र, आता त्यांना उद्धव ठाकरेंचं महत्त्व कळून चुकलं असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांची भरपाई करण्यासाठी पहिल्यांदा त्यांना शिवसेना फोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करावं लागलं. त्यानेही भागलं नाही म्हणून राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवलं. त्यानंतरही त्यांना काँग्रेस फोडावी लागली. शिवाय आता मनसेलाही सोबत घेत आहेत. त्यामुळे एकट्या उद्धव ठाकरेची ताकद किती होती हे आता भाजपला समजलं असेल.”

कल्याण लोकसभेसाठी इच्छुक आहात का?

कल्याण लोकसभेसाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारलं असता ते म्हणाले, “पक्षाने मला सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्यासाठी मी काम करत आहे. या अगोदर आम्ही दहा मतदारसंघांमध्ये मेळावे घेतले आहेत. तसेच कल्याणच नव्हे, तर ज्या ज्या ठिकाणी आमचा उमेदवार असेल त्याला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सगळे मिळून विजयी करू.”

Raj Thackeray, Amit Shaha, Udhhav Thackeray
Raj Thackeray Alliance BJP: राज ठाकरे सोबत डीलसाठी फडणवीस का नाहीत? विनोद तावडेंसोबत अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना

रामटेकच्या जागेबाबात बोलताना सरदेसाई म्हणाले, “रामटेकमध्ये पदाधिकाऱ्यांनी मेळावे घेतले आहेत. रामटेक लोकसभा असो किंवा विधानसभा तिथे शिवसेनेची भरपूर ताकद आहे, हा शिवसेनेचा गड आहे. परंतु तिथे उमेदवार कोण असेल हे वरिष्ठ नेते ठरवतील.”

Raj Thackeray, Amit Shaha, Udhhav Thackeray
Kalayn Lok Sabha Election News : कमळावरच लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह; डॉ. श्रीकांत शिंदेंची डोकेदुखी वाढणार

“आंबेडकरांना सन्मानजनक जागा देण्याची तयारी”

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. ते राहुल गांधींच्या  सभेच्या व्यासपीठावर देखील उपस्थित होते. त्यांना सन्मानपूर्वक किती जागा देता येतील,  यासाठी तिन्ही पक्षांची तयारी आहे. मात्र, याचा निर्णय आंबेडकरांना घ्यायचा असल्याचंही सरदेसाई म्हणाले.

(Edited By - Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com