पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार! काँग्रेसच्या मंत्री, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
Uddhav Thackeray and Bhagat Singh Koshyari
Uddhav Thackeray and Bhagat Singh Koshyari File Photo

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीवरून पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 16 मार्च ही तारीख निश्चित केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना याबाबत सरकारने प्रस्ताव पाठवला असून, यावर अद्याप त्यांनी निर्णय घेतलेला नाही. यावर आता काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. यामुळे राजकारण तापले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या (Assembly Speaker) निवडीबाबत काँग्रेसच्या (Congress) मंत्री आणि आमदारांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयात ही याचिका दाखल झाल्याने अध्यक्ष निवडणुकीत अडथळा निर्माण होऊ शकतो, यावर मुख्यमंत्र्यांशी बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याशी बोलून त्यांची वेळ घ्यावी, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच मागील कॅबिनेट बैठकीत राज्यपालांची भेट घेण्याचा शब्द दिला होता. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत घटनात्मक बाबी तपासू आणि त्यानंतर राज्यपालांशी भेटीची वेळ मागतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Uddhav Thackeray and Bhagat Singh Koshyari
भाजपला मोठा धक्का! आमदारांचं निलंबन उच्च न्यायालयानं ठेवलं कायम

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबत 9 मार्च रोजी राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पत्र पाठविले आहे. पण या पत्राला राज्यपालांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधिमंडळाचे कामकाज अध्यक्षाविना चालू शकत नाही. अजून राज्यपालयांच्याकडून तारीख आलेली नाही. आमच्या आमदारांची बैठकीत याच अधिवेशनात अध्यक्ष निवडीचा निर्णय घ्यायचा ठरले आहे. आजच आम्ही घटक पक्षांशी चर्चाकरून राज्यपालांशी संपर्क साधू. आमचे नाव निश्चित आहे पण तारीख यायची वाट पाहतोय.

Uddhav Thackeray and Bhagat Singh Koshyari
भाजपसोबतचा हनिमून संपला? मुख्यमंत्री नितीश अन् विधानसभा अध्यक्षांत नळावरचं भांडण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांची नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर निवडणूक होणार का याबाबत प्रश्ननिर्माण झाले आहे. आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शविला आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिला तेव्हापासून अध्यक्षांची खुर्ची रिकामी आहे. मागील दोन अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, निवडणूक झाली नाही. अखेर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 16 मार्चला होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com