Maharashtra Political News : काँग्रेसचे आमदार संजय जगताप अजितदादांच्या भेटीसाठी 'देवगिरी'वर

Congress-NCP-BJP : काँग्रेस फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जगताप-पवार भेटीकडे लक्ष
Sanjay Jagtap, Ajit Pawar
Sanjay Jagtap, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Jagtap Meets Ajit Pawar : राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटून वर्षाभरातच दुसरा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यानतंर आज गुरुवारी (ता. १३) पवार यांची काँग्रेसचे पुरंदरमधील आमदार संजय जगताप यांनी अचानक भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळांतून चर्चांना उधाण आले आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते देण्यास शिवसेनेच्या आमदारांचा तीव्र विरोध असल्याने खातेवाटप रखडल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेस पक्षाचाही एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहे. या गटामुळेच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडल्याची माहिती आहे. काँग्रेसचा हा गट सरकारमध्ये आल्यास त्यांना कुठली खाती द्यायची, यावर सध्या मुंबई आणि दिल्ली पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते आहे.

Sanjay Jagtap, Ajit Pawar
Maharashtra Politics : राज्यात तिसऱ्या भूकंपाची शक्यता; 'या' कारणामुळे खातेवाटप आणि विस्तार रखडल्याची चर्चा

सध्या काँग्रेस फुटीची जोरदार चर्चा सुरु असताना काँग्रेसचे पुरंदरमधील आमदार संजय जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. संजय जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अजितदादांची भेट घेतली. दरम्यान, काँग्रेसमधील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते राज्य सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय जगताप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होत आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sanjay Jagtap, Ajit Pawar
Nawab Malik : नवाब मलिकांना हायकोर्टाचा दणका ; वैद्यकीय जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, फुटीच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांशी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी संवाद साधला आहे. यामुळे काहींचे मनपरिवर्तन झाले असले तरी काहीजण भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते आहे. यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय चित्र नेमके कसे असेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

आमदार रोहित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपचा डोळा काँग्रेसवर असल्याचे विधान केले होते. अपक्ष आमदार आणि मंत्रिपदासाठी इच्छूक बच्चू कडू यांनींही काँग्रेस लवकरच सरकारमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com