BJP Minister Threatened: खळबळजनक! काँग्रेस आमदाराची 'दादागिरी'; भाजप मंत्र्याला परिवारासह थेट संपवण्याचीच धमकी

Congress MLA Aslam Shaikh Threat to Mangalprabhat Lodha : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या विधानसभा मतदारसंघातील हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. यावेळी लोढा यांनी आमदार अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Mangalprabhat Lodha .jpg
Mangalprabhat Lodha .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महापालिकेची निवडणूक जवळ येत असतानाच मुंबईच्या राजकारणातील वादाचे मुद्दे तापण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपही गाजू लागले आहेत. अशातच मुंबईच्या तापलेल्या राजकारणातून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्यानं थेट मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांना संपवण्याची भाषा वापरत धमकावल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे मालाड मालवणीचे आमदार अस्लम शेख यांनी राज्याचे कौशल्य विकासमंत्री व भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिली आहे. थेट संपवण्याचीच भाषा वापरल्यामुळे लोढा यांनी या धमकीनंतर थेट मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. लोढा यांनी मुंबईतील रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा तापवल्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये वादाचा भडका उडाला आहे.

मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील मलबार हिल मतदारसंघाचे आमदार आहेत. तर अस्लम शेख हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईचे पालकमंत्री होते. आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोढा विरुद्ध शेख हा संघर्ष पेटला आहे. यानंतर मुंबईचं राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी शेख यांच्या धमकीवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेस आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या विधानसभा मतदारसंघातील हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. यावेळी लोढा यांनी आमदार अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शेख हे मालवणीत अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालत असून मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळत आहेत. पण हे आम्ही हे खपवून घेणार नसल्याचा इशाराही लोढांनी दिला आहे.

Mangalprabhat Lodha .jpg
Vote Chori update : बिहारमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींसाठी आनंदाची बातमी; ‘मतचोरी’ प्रकरणात मोठी घडामोड, सत्य समोर येणार

मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्याकडून वारंवार समाज विघातक शक्तींना अभय दिले जात आहे, तसेच संविधानाच्या मूल्यांना ठेच पोहचवली जात आहे. तसेच घुसखोर बांग्लादेशींच्या अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करून शासकीय कामकाजात सातत्याने अडथळा निर्माण करत असल्याचा खळबळजनक दावाही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.

Mangalprabhat Lodha .jpg
Satara Politic's : कऱ्हाडमध्ये मोठी राजकीय घडामोड; शिंदेसेनेच्या मोठ्या नेत्याने घेतली पृथ्वीराज चव्हाण यांची भेट, साताऱ्यात खळबळ

मंत्री लोढा याबाबत म्हणाले, मालाड मालवणीमधील घुसखोर बांग्लादेशींच्या अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईबाबत पाठपुरावा करत असल्यानेच मला आणि माझ्या परिवाराला संपवण्याची धमकी त्यांनी दिली आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून आपण तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com