Varsha Gaikwad BMC : आरोग्य विभागाचा निधी जातो कुठे? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा घणाघात

Congress MP Varsha Gaikwad Questions Mumbai BMC Health Department Fund Allocation : मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
Varsha Gaikwad BMC
Varsha Gaikwad BMCSarkarnama
Published on
Updated on

Mumbai municipal health department : मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्यसेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे.

रुग्णांना मूलभूत सुविधादेखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? असा प्रश्न मुंबई काँग्रेस (Congress) अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी वांद्रे इथल्या भाभा रुग्णालयाला भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी गायकवाड म्हणाल्या, ‘वांद्रे पश्चिम इथं के. बी. भाभा रुग्णालयाचे कॅथलॅब, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डियाक व ब्लड बँक या सुविधा पुरवल्याशिवाय उद्‍घाटन होणार नाही, अशी ग्वाही महापालिकने दिली होती; परंतु आजपर्यंत या सुविधा सुरू झालेल्या नाहीत. या ठिकाणी पुरेसे डॉक्टरही नाहीत. रुग्णांना वेळेवर औषधे मिळत नाहीत. मधुमेह, ब्लड प्रेशरच्या औषधांचा तुडवडा आहे'.

2024-25मध्ये औषधांसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ती यावर्षी कमी करून सहा कोटी रुपये केली आहे. 14 महिन्यांपासून औषधांच्या निविदा काढलेल्याच नाहीत. 'सीटी स्कॅन', 'एमआरआय'सारख्या तपासण्यांसाठी या उपनगरी रुग्णालयांमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा तपासण्यांची गरज भासल्यास रुग्णांना मोठा खर्च करून बाहेर जावे लागते, याकडे खासदार वर्षा गायकवाड यांनी लक्ष वेधलं.

Varsha Gaikwad BMC
Lawrence Bishnoi gang : बिश्नोई गँगच्या 'कॉन्ट्रॅक्ट किलर'च्या अटकेचा थरार; 'स्लिपरसेल' म्हणून कार्यरत...

मिठीची सफाई झालीच नाही

खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (ता.3) मिठी नदीचीही पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिका व राज्य सरकारच्या कामावर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘महापालिका आयुक्तांनी स्वतः मान्य केले आहे की, यावर्षी मिठी नदीची सफाई केवळ 55 टक्के पूर्ण झाली आहे.

Varsha Gaikwad BMC
Dipankar Bhattacharya : मोदी सरकार अदानी-अंबानींसारख्या काही धनिकांच्या सेवेत; दीपांकर भट्टाचार्य यांचा घणाघात

'तुंबई' करणाऱ्यांवर कारवाई कधी?

संपूर्ण मुंबईत नाल्यांची सफाई पाहिली, तर ती केवळ 68 टक्के पूर्ण झाली आहे. पालिका प्रशासन आणि सरकारच्या हलगर्जीमुळे मुंबईकरांना पूरस्थितीची समस्या अजून किती काळ सहन करावी लागणार आहे? या बेजबाबदारपणाला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर कारवाई कधी होणार? असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com