Yamini Jadhav : दक्षिण मुंबईत दोन शिवसैनिकांमध्ये 'टफ फाइट'! अरविंद सावंतांविरोधात यामिनी जाधव लढत जाहीर

South Mumbai Constituency : यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
Yamini Jadhav
Yamini JadhavSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : शिवसेनेने दक्षिण मुंबईमधून अखेर यामिनी यशवंत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या नावावर मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब झाले होते. यानंतर अखेर आज याबाबत शिवसेनेने पत्रक काढून अधिकृत घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yamini Jadhav
Kalyan Lok Sabha News : दरेकरांचे टेन्शन वाढले; उमेदवारी अर्ज दाखल करताच डोंबिवलीत ठाकरे गटात वादाचा भडका

या मतदारसंघासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांचीही नावे सुरुवातीस चर्चेत होते. मात्र, हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने या ठिकाणी आता यामिनी जाधव या उमेदवार झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

यामिनी जाधव या उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणूनही काम केले आहे. मुंबई महापालिकेच्या बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षही त्या होत्या. शिवाय विधिमंडळ शक्ती विधेयक समितीच्या सदस्याही होत्या.

Yamini Jadhav
Thackeray Vs Shinde: ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटाच्या गळाला; आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांवर नाराज असल्याने...

यामिनी जाधव यांनी एमआयएमचे वारीस पठाण यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com