Kalyan Lok Sabha News : दरेकरांचे टेन्शन वाढले; उमेदवारी अर्ज दाखल करताच डोंबिवलीत ठाकरे गटात वादाचा भडका

Political News : कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरच डोंबिवली ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.
Vaishali Darekar, Srikant Shinde
Vaishali Darekar, Srikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dombivili News : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कल्याण लोकसभा हा शिवसेना बालेकिल्ला असून शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर निवडणुकीसाठी उभे आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे स्वतः तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे असून, ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर त्याच्या समोर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते.

ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरच डोंबिवली ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. डोंबिवली शहर प्रमुखांसह महिला संघटक, युवती सेना, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाकरे गटातील नाराजी समोर आली आहे.

Vaishali Darekar, Srikant Shinde
Raigad Lok Sabha Constituency महिला मतदार ठरविणार रायगडचा खासदार !

कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट हे शिवसेनेचे दोन गट आमने सामने येणार आहेत. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी आव्हान उभे केले आहे. दरम्यान, मंगळवारी आदित्य ठाकरे यांचा डोंबिवली दौरा आटोपतो न आटोपतो तोच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला हा धक्का दिला आहे. ठाकरे गटातील हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी सात माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. आता ठाकरे गटाचे पदाधिकारी यांचा प्रवेश ठाण्यात होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात करणार प्रवेश

उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुख, महिला संघटक, युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात करणार प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहॆ. शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हासंघटक कविता गावंड, युवती सेना जिल्हाधिकारी लीना शिर्के, उपशहर संघटक किरण मोंडकर, राधिका गुप्ते, राजेंद्र नांदुस्कर, श्याम चौगुले ही मंडळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

R

Vaishali Darekar, Srikant Shinde
Vaishali Darekar News: भाजपची कीव येते, फडणवीसांनी एकदाचं केलं जाहीर; वैशाली दरेकरांचा टोमणा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com