Davos World Economic Forum : शिंदे-फडणविसांची ही फसवाफसवी अजून किती काळ चालणार ? ; काँग्रेसचा टोमणा

Congress Criticised Shinde Government : जनतेला तोंड दाखवायची पंचायत झाल्याने महाराष्ट्रातीलच कंपन्यांशीच करार करुन दावोसहून गुंतवणूक आणल्याचा कांगावा केला,
World Economic Conference, Davos
World Economic Conference, Davossarkarnama

Maharashtra Politics : राज्यातील नियोजित उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकार होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे नुकतेच दावोस परिषदेहून आले आहेत. या परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Davos World Economic Forum news update)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागल्यानंतर आता मुख्यमंत्री हे काँग्रेसच्या रडारवर आहे. काँग्रेसच्या टि्वट हॅडलवरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन त्यांची खिल्ली उठवली आहे.

"शिंदे-फडणविसांची ही फसवाफसवी अजून किती काळ चालणार?," असे टि्वट काँग्रेसने केले आहे. "गुजरातला गेलेले प्रकल्प महाराष्ट्रात आणता आले नाही, परदेशी गुंतवणूकही महाराष्ट्रात आणता आली नाही. परिणामी जनतेला तोंड दाखवायची पंचायत झाल्याने महाराष्ट्रातीलच कंपन्यांशीच करार करुन दावोसहून गुंतवणूक आणल्याचा कांगावा केला," असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

World Economic Conference, Davos
ICICI Videocon loan fraud case : वेणुगोपाल धूत यांना देश सोडण्यास बंदी ; उच्च न्यायालयाने त्यांना..

पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यां समवेत तब्बल ४५९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांना रोजगार मिळणार आहेत. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

World Economic Conference, Davos
Teachers Constituency News : शिंदे गटाच्या उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग ? ; राष्ट्रवादी आक्रमक

या बैठकीत Greenko energy Projects Pvt.Ltd सोबत १२००० कोटींची गुंतवणूक, Berkshire Hathaway Home Services Orenda India सोबत १६००० कोटींची गुंतवणूक, ICP Investments/ Indus Capital सोबत १६००० कोटींची गुंतवणूक, Rukhi foods सोबत ४८० कोटींची गुंतवणूक तर Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. सोबत १६५० कोटींची गुंतवणूक असे ४५९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com