Videocon Loan Case News : ICICI बँक व्हिडिओकॉन घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज (शुक्रवारी) मुंबई उच्चन्यायालयाने वेणुगोपाल धूत यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. (videocon loan fraud case news update)
एक लाख रुपयांच्या जामिनावर त्यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. "तपासात सहकार्य करा, साक्षीदारांच्या पुराव्यांशी छेडछाड करू नका," असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वेणुगोपाल धूत यांना दिला आहे. पासपोर्ट जमा केल्यानंतर परवानगीशिवाय देश सोडण्यास उच्च न्यायालयाने त्यांना बंदी घातली आहे.
२६ डिसेंबर २०२२ रोजी कथित कर्ज फसवणूक प्रकरणात त्यांना सीबीआयने अटक केली होती. विशेष सीबीआय न्यायालयाने ५ जानेवारी रोजी त्यांची याचिका फेटाळल्यानंतर धूत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धूत यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता आणि अंतरिम सुटकेची मागणी केली होती. यावर आज सुनावणी झाली.
धूत तपासात सहकार्य करत असल्याने त्यांची अटक अवाजवी आहे, असा युक्तीवाद धूत यांचे वकील संदीप लड्ढा यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता
वेणूगोपाल धूत तपासात टाळाटाळ करत असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने केला होता. सीबीआयने आपली अटक मनमानी, बेकायदेशीर, कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ४१ (ए) चे उल्लंघन आहे. या अटकेसाठी सीबीआयने कोणतीही नोटीस बजावली नसल्याचे धूत यांनी आपल्या अटकेबाबत सादर केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.