Maharashtra Congress News : विधान परिषदेतील पराभवाचं खापर काँग्रेसने फोडलं अशोक चव्हाणांवर?

Nana Patole Vs Ashok Chavan : विधानपरिषदेच्या निवडणुकीत जी चूक झाली ती राज्यसभा निवडणुकीत होणार नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Nana Patole NCP
Nana Patole NCPSarkarnama
Published on
Updated on

Rajyasabha Election 2024 : राज्यसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांकडून नाव जाहीर करण्यात आली आहेत. महाविकास आघाडीमधून काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांचं नाव राज्यसभेसाठी देण्यात आलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हांडोरे यांना जिंकून आणण्यासाठी महाविकास आघाडीला पुन्हा एकदा शर्तीचे प्रयत्न करावेा लागणार आहेत. या अगोदर चंद्रकांत हांडोरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन, महाविकास आघाडी सत्तेत असून देखील काँग्रेसला पराभव सहन करावा लागला होता. याच खापर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांवर फोडल्याचं दिसत आहे.

अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. त्यानंतर बुधवारी अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देखील देण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रकांत हांडोरे यांना महाविकास आघाडी सत्तेत असताना विधान परिषदेचे तिकीट दिलं होतं. मात्र त्यावेळी काँग्रेसची काही मतं फुटली होती तेव्हा केवळ भाई जगताप यांचा विजय झाला होता. तर भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला मात्र महाविकास आघाडीतील एका उमेदवाराचा पराभव झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole NCP
Shivsena Politics : शिवसेनेकडून आयात उमेदवार राज्यसभेवर; देवरांचा शिवसेनाप्रवेश ही भाजपची स्क्रिप्ट?

आता मात्र राज्यात राजकीय गणितं बदलली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसचेही मोठे नेते महायुतीत जात आहेत. जर उद्यापर्यंत भाजपाने चौथा उमेदवार दिला तर मात्र काँग्रेसची अडचण वाढण्याची शक्यता आहे. जर भाजपाने उमेदवार दिला नाही तर मात्र ही निवडणूक बिनविरोध ठरेल. परंतु जी चुकी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाली ती चुकी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी दर्शवला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली, मात्र हे सगळं ज्यांनी घडवून आणलं ते आता आमच्या पक्षात नाही आहेत. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी दिली. त्यामुळे अप्रत्यक्षपणे काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे.

Nana Patole NCP
Ashok Chavan : चेन्नीथलांना आव्हान, राऊतांना प्रत्युत्तर, बाबांना टोला; काँग्रेस सोडण्याचं कारणंही चव्हाणांनी सांगितलं

आमदारांना व्हीप जारी -

काँग्रेस पक्षांतील आमदारांना पक्षातर्फे व्हीप जारी करण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांना विजयी करण्यासाठी हा व्हीप लागू करण्यात आला आहे. चंद्रकांत हांडोरे हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार आहेत आणि त्यांना विजय करून देण्यासाठी महाविकास आघाडी पक्षांना त्यासाठी जोरदार प्रयत्न आणि तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी पक्षाने आता व्हीप जारी केला आहे. जे आमदार काँग्रेस पक्षासोबत आहेत, त्यांना पक्षासोबत कायम ठेवण्याची जबाबदारी नेतृत्वाची आहे. मात्र आता राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे किती आमदार, त्यांचा हात सोडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com