

Andheri by-elections| मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेस (Congress) शिवसेनाला (Shivsena) पाठिंबा देणार असल्याची घोषणा कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनानंतर त्यांची विधानसभेची जागा रिक्त झाली. या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली असून ३ नोव्हेंबरला या जागेवर मतदान जाहीर केले असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली होती.
अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडीचे सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय या सरकारने घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भाजपने ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडी सरकार पाडले. अशी टीकाही नाना पटोले यांनी यावेळी केली.
भाजपने महाविकास आघाडी फोडण्याचेही प्रयत्न केले ते यशस्वी झाले नाहीत. म्हणून त्यांनी शिवसेना पक्षच फोडला. पण भाजपविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. असा विश्वासही त्यांनी दिला. तसेच, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसल्याचे जाहीर करत शिवसेना या जोगेवर जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.