Thane News : जालना येथे मराठा आरक्षणासाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवावर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सकल मराठा मोर्चाच्यावतीने सोमवारी ठाणे बंद पुकारला आहे. यामुळे आता या मराठा आरक्षण आंदोलनाची धग जालन्यापासून ते थेट मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यापर्यंत पोहचले आहे. (Latest Marathi News)
ठाणे बंद करण्याबाबत ठाण्याच्या शासकीय विश्राम गृह येथे सकल मराठा मोर्चा पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याची माहिती, सकल मराठा मोर्चाचे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी दिली.
जात, धर्म पक्ष आणि नेता बाजूला ठेवून सर्वांनी या बंदला प्रतिसाद देऊन आपल्या हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने हा बंद पुकारला आहे. शुक्रवारी रात्री ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात सकल मराठा मोर्चाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली याबाबत एक बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
येत्या दोन दिवसात या नियोजित बंदबाबत प्रत्येक कार्यकर्त्याची गल्लीबोळात, रस्त्यावर बैठक होणार आहे. ठाणे बंद मध्ये सर्वांनी सहकार्य करून सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच, या बैठकीत विविध राजकीय पक्षांशी संबंधित मराठा समाजाच्या संस्था आणि संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती सकल मराठा मोर्चाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.