Sanjay Raut : माझ्या खोलीत हवा येत नाही... त्यावर न्यायाधीश म्हणाले....

Sanjay Raut यांना दहा ऑगस्टपर्यंत कोठडीची होती ईडीची मागणी. आठ ऑगस्टपर्यंत कोठडी
Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचा निर्णय आज न्यायाधिशांनी दिला. राऊत हे तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा या वेळी ईडीने केला. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत ते आता ईडीच्या कोठडीत राहतील.

वर्षा राऊत यांच्या बॅक खात्याची चौकशी करणे गरजेचे असून त्यांच्याखात्यातून अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवण्यात आलेेले आहे. याबाबत राऊत यांच्याकडे चौकशी केली असता ते सहकार्य करत नाहीत. ज्या व्यक्तींना पैसे हे दिलेले आहेत. त्यांना ईडीने चौकशीला बोलावलं आहे, अशी माहिती ईडीने या वेळी दिली.

Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
शिंदे गटाला केंद्रात ३ मंत्रिपद; राहुल शेवाळे, प्रताप जाधव, श्रीरंग बारणेंची नावं चर्चेत

संजय राऊत यांना १०६ कोटी रुपये प्रवीण राऊत यांनी दिले. बॅकेच्या व्यवहारात हे दिसून आले आहे. राऊतांचा परदेशाचा खर्च प्रवीण राऊत करत होते. प्रवीण राऊत याच्याकडून महिना दोन लाख रुपये राऊत यांना मिळत होते, असे ईडीने या वेळी सांगितले. याचा तपास होणे बाकी असून त्यानुसार कोठडीची गरज असल्याती मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
PMC Election 2022 : चार सदस्यीय प्रभागरचनेच्या विरोधात राष्ट्रवादी सर्वोच्च न्यायालयात जाणार !

या सुनावणीच्या वेळी राऊत यांनी मला हृदयाचा त्रास आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. रात्री जिथे मला झोपायला देतात तिथेही तिच परिस्थिती आहे, अशी तक्रार केली. त्यावर न्यायाधीशांनी या वर काय उपाययोजना करणार, असा सवाल ईडीच्या वकिलांना केला. ती खोली वातानुकूलीत असल्याचे वकिलांनी सांगितले. पण मला एसीचा त्रास होता. तेथे खिडकी नाही, असे राऊत यांनी पुन्हा सांगितले. त्यावर मोकळी हवा असणाऱ्या खोलीची व्यवस्था करण्यात तयार आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आता काही तक्रार आहे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी राऊतांना केला. त्यावर नाही, असे उत्तर राऊत यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com