Criminal MP : 'या' लोकसभा निवडणुकीत जिंकणाऱ्या खासदारांमध्ये 'क्रिमिनल' वाढले ?

Loksabha Election : भाजपच्या यादीतून नुकत्याच एका क्रिमिनल असलेल्या खासदाराचे तिकीट कापण्यात आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशात पुरोगामी राज्य अशी ओळख असलेले महाराष्ट्रातील 58 टक्के खासदार हे क्रिमिनल होते. एकावर थेट मॅर्डरचा गुन्हा आणि आरोप आहे.
Sansad
SansadSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही लोकशाहीत मोठी समस्या आहे. ती टाळण्यासाठी जागृत मतदार मोलाची भूमिका बजावू शकतात. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदारांनी गुन्हेगार राजकारण्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्यास राजकारण स्वच्छ होण्यास मोलाची मदत होईल. त्यामुळे चुकीचे खासदार तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेत विराजमान होणार नाहीत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 539 विजयी खासदारांपैकी 43 टक्के खासदारांच्या विरोधात क्रिमिनल केसेस होत्या. त्याची संख्या ही 233 इतकी होती, तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विजयी 185 खासदारांवर क्रिमिनल केसेस होत्या. त्याचबरोबर 2009 लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 162 खासदारांवर क्रिमिनल केसेस होत्या. 2009 च्या तुलनेत क्रिमिनल केसेस असलेल्या खासदारांमध्ये जवळपास 44 टक्के वाढ झाल्याचे चित्र होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sansad
Shivsena UBT News : खैरेंचा मुहूर्त चुकला; तर दानवेंनी टाइमिंग साधले...

लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 159 खासदारांवर सीरियस क्रिमिनल केसेस होत्या. त्यात बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, किडनॅपिंग, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे या खासदारांच्या विरोधात होती. लोकसभा निवडणूक 2009 व 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये सीरियस क्रिमिनल केसेस असलेल्या विजयी खासदारांची संख्या मोठी होती. त्यात 109 टक्के वाढ झाली होती. दहा खासदार असे होते, ज्यांच्यावर न्यायालयाने विविध कलमांन्वये दोषारोप सिद्ध करत त्यांना शिक्षा सुनावली होती. यात महाराष्ट्रातील एका भाजप खासदाराचा समावेश होता.

गेल्या लोकसभा निवडणुकीत 11 विजयी खासदारांमध्ये खुनाचा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. यात तत्कालीन एनसीपीच्या एका महाराष्ट्रातील खासदाराचे नाव आहे. देशभरातील या अकरा खासदारांमध्ये भाजपचे चार, बीएसपीचे दोन, काँग्रेसचे एका खासदाराचा समावेश आहे. खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा असलेल्या खासदारांची संख्या ही 30 होती, तर 19 खासदारांच्या विरोधात महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांची नोंद होती, तर तिघा खासदारांवर बलात्काराचा गुन्हा नोंदविलेला होता. यात भाजप, काँग्रेस आणि वायएसआरसीपी या पक्षांचा प्रत्येकी एक खासदार होता.

सहा खासदारांवर किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता, त्यातील चार भाजपचे, एक बीएसपीचा आणि एक अपक्ष खासदार होता. 29 खासदारांवर सामाजिक तणाव निर्माण होईल अशा भाषणाचे गुन्हे होते. क्रिमिनल केसेस असलेल्या खासदारांचे जिंकण्याचे प्रमाण हे 15.5 टक्के होते, तर त्याच वेळी स्वच्छ चरित्राच्या खासदारांचे जिंकण्याचे प्रमाण हे 4.7 टक्के इतकेच होते. भाजपच्या 116 खासदारांवर क्रिमिनल केसेस होत्या, तर काँग्रेसच्या 29 खासदारांवर, शिवसेनेच्या 11, डीएमके च्या 10, तृणमूलच्या 9, जनता दल (युनायटेड) च्या 13 खासदारांवर क्रिमिनल केसेस होत्या.

आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 जाहीर होत आहे. असे असताना गेल्या दोन (2009 व 2014) निवडणुकीच्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गुन्हेगार असलेल्या राजकारण्याचे खासदार होण्याचे प्रमाण वाढले होते. असा दावा एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे. आज घोषित होणारी लोकसभा निवडणूक पाहता मतदारांनी गुन्हेगार राजकारणी निवडून येणार नाहीत, याची दक्षता घेतल्यास लोकशाहीत राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबविण्यात मतदारांचा हातभार लागेल. याविषयी मतदारांनी जागृत राहण्याची गरज आहे. गुन्हेगार उमेदवाराला त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती ही आता सार्वजनिक करावी लागते. त्याला न्यूज पेपर, लोकल चॅनेलवर असलेल्या गुन्ह्यांचा तपशील जाहीर करावा लागतो. क्रिमिनल केसेस असलेल्या खासदारांना निवडण्यात महाराष्ट्र देशात वरून पाचव्या स्थानी होता. महाराष्ट्रातील 58 टक्के खासदारांवर क्रिमिनल केसेस होत्या. त्यामुळे यंदा काहींना क्रिमिनल केसेसमुळेच राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी नाकारल्याची चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आहे.

R

Sansad
Vijay Shivtare News : विजय शिवतारे रुग्णालयात दाखल, केसरकर अन् शेवाळेंकडून समजूत घालण्याचा प्रयत्न?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com