INDIA Meeting In Mumbai: 63 नेत्यांसाठी 30 लाखांच्या खुर्च्या अन् जेवणासाठी लाखो रुपयांचे प्लेट; 'इंडिया'च्या बैठकीवर कोट्यवधींचा खर्च ?

INDIA Vs Mahayuti : चौदा ते पंधरा तासांच्या या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च ? सत्ताधाऱ्यांनी साधला निशाणा
INDIA Meeting
INDIA Meeting Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबईत 'इंडिया' आघाडीची ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये दोन दिवसीय बैठक होत आहे. तब्बल 28 पक्षाचे 63 नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीसाठी 'इंडिया'कडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याने सत्ताधारी नेत्यांकडून विरोधकांवर जोरदार निशाणा सधला जात आहे.

या बैठकीसाठी 45 हजारांच्या 63 खुर्च्या मागवण्यात आल्या आहेत. चौदा ते पंधरा तासांच्या या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. ग्रँड हयातमधील एका खोलीचा दर हा 30 हजार रुपये इतका असून जेवणाची एक प्लेट ही साडेचार हजार रुपयांची आहे. त्यामुळे फक्त 14 तासांच्या या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे.

INDIA Meeting
INDIA Aghadi Meeting In Mumbai : राहुल गांधी, सोनिया गांधींचे मुंबईत या शिवसेना नेत्यांनी केले स्वागत...

'इंडिया'च्या बैठकीसाठी एवढा खर्च केला जात असल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. इतकच नाही तर या बैठकीतील 'व्हीआयपी' वागणुकीवरून आणि हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरून 'इंडिया'ला आगामी काळात टीकेला समोरे जावे लागणार आहे.

'इंडिया' आघाडीबाबत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. "मुंबईत असंतुष्टांचा मेळावा भरत असून देशाचे नाव राजकारणासाठी वापरणे हे दुर्दैवी आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर 'इंडिया' आघाडी संपुष्टात आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

INDIA Meeting
INDIA Logo : 'इंडिया'चा 'लोगो' कसा असणार ? नेत्यांच्या गुप्ततेमुळे उत्सुकता शिगेला !

याचवेळी उदय सामंत यांनी ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर देखील जोरदार हल्लाबोल केला. "जी यादी हॉटेलकडे गेली, त्यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) हा पक्ष 26 व्या स्थानावर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 25 व्या स्थानी आहे. यावरूनच महाराष्ट्रातील दोन पक्ष हे शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत, असा खोचक टोला सामंतांनी लगावला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com