BJP-MNS Alliance : भाजप-मनसेची अनोखी युती; भाजप माजी आमदारांची कन्या होणार राजू पाटलांची सून

Raju Patil's son's Engagement : या दोन पक्षांतील आजी-माजी आमदारांच्या या नात्यातील युतीची ठाण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Raju Patil's son's Engagement
Raju Patil's son's Engagement Sarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान आचार्य

Dombiwali News : गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, त्यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र, ठाण्यात या दोन्ही पक्षांत अनोखी युती झाली आहे. होय... या दोन पक्षांतील आजी-माजी आमदारांच्या या नात्यातील युतीची ठाण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Daughter of former BJP MLA will be daughter-in-law of MLA Raju Patil)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मुलाचा साखरपुडा नुकताच मोठ्या थाटात झाला. मात्र, तो साखरपुडा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चिला जात आहे. कारण, महाराष्ट्रात मनसे आणि भाजपमध्ये युती होणार, अशी चर्चा गेली वर्ष, दीड वर्षापासून राज्यात सुरू आहे. या साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर त्या चर्चेला पुन्हा उजाळा मिळत आहे. राजू पाटील यांची होणारी सून ही भाजपच्या एका माजी आमदाराची मुलगी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Patil's son's Engagement
Pandharpur Obc Melava : मंत्री बंत्री मी नंतर अगोदर ओबीसी कार्यकर्ता; छगन भुजबळांचा पंढरीतून इशारा

भिवंडीचे भाजपचे माजी आमदार योगेश पाटील यांची कन्या सिद्धी पाटील आणि राजू पाटील यांचे पुत्र आदित्य पाटील यांच्या साखरपुड्याचा शुक्रवारी समारंभ झाला. भाजपचे माजी आमदार योगेश पाटील आणि राजू पाटील व्याही-व्याही झाल्याने आता मनसे आणि भाजपचीही युती होणार का, अशी चर्चा कल्याण-डोंबिवलीमध्ये रंगली आहे. या साखरपुड्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे राज ठाकरे यांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. माजी आमदार योगेश पाटील हे भाजपचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. राजू पाटील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा मुलगा आदित्य हा अजूनही सक्रिय राजकारणात दिसून येत नसला तरी ते उच्चशिक्षित आहेत. राजू पाटील यांना व्यवसायात ते मदत करीत असतात. ते लवकरच भाजपनेते योगेश पाटील यांचे जावई होणार आहेत, त्यामुळे ते राजकारणात कधी सक्रिय होणार, असा सवालही विचारला जात आहे.

Raju Patil's son's Engagement
MNS Melava : ‘आता फक्त एक पिशवी उघडली आहे, निवडणुकीवेळी ‘तो’ दारुगोळा बाहेर काढू’

ठाणे येथील ढोकाळी परिसरातील हायलँड पार्क येथे हा साखरपुड्याचा समारंभ झाला. या समारंभाला डोंबिवलीतील अनेक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

Edited By : Vijay Dudhale

R...

Raju Patil's son's Engagement
Thackeray Group News : ठाकरेंना बीडमध्ये पुन्हा धक्का; अंधारेंवर आरोप, सहसंपर्कप्रमुखांची शिंदेसेना प्रवेशाची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com