MNS Melava : ‘आता फक्त एक पिशवी उघडली आहे, निवडणुकीवेळी ‘तो’ दारुगोळा बाहेर काढू’

Raj Thackeray Sabha : जमिनी काढून घेण्याची एक प्रकारची नवी ‘सहकार चळवळ’ महाराष्ट्राच्याविरोधात चालवली जात आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai : सध्याच्या घडामोडी पाहता, हे लोक उद्या मुंबईलाही हात घालतील. उद्या महाराष्ट्रातून विदर्भाचा तुकडा पाडायलाही, हे मागेपुढे पाहणार नाहीत, त्यामुळे राज्यातील जनतेने सावध राहिले पाहिजे. या विषयावर आपण निवडणुकीच्या वेळी भरपूर बोलू. आता फक्त मी एक पिशवी उघडली आहे. त्यावेळी तो दारूगोळा बाहेर काढू, असा सूचक इशाराही राज ठाकरे यांनी दिला. (We will take out ammunition related to cooperative department during election : Raj Thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार विभागाच्या वतीने नवी मुंबई येथील नेरुळ येथे सहकार कार्यकर्ता मेळावा आयोजिण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना भूसंपादन, महानंद डेअरी आणि मुंबईच्यासंदर्भाने विविध विषयांवर भाष्य केले. त्या वेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पावरून टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Raj Thackeray Sabha : महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न अन्‌ आपले नेते मिंधे, लाचार झालेत; राज ठाकरेंचा घाणाघात

ते म्हणाले की, आजपर्यंतची सर्व युद्धे झाली, तो इतिहास आहे. इतिहास भूगोलशिवाय पूर्ण होत नाही. ही महायुद्धे जमिनीसाठी आणि वर्चस्वासाठी झाली आहेत. त्या वेळी अतिक्रमणं होत असल्याने समजायचं तरी. पण, आज महाराष्ट्रात न कळता जमिनी काढून घेतल्या जात आहेत. मोठमोठ्या प्रकल्पासाठी सर्वसामान्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत.

नवी मुंबईत विमानतळ, मुंबईला जोडणारा रस्ता होत आहे. त्या वेळी बाहेरचे लोक तुमच्या जमिनी घेणार, पण माझी मराठीबांधवांना विनंती आहे की, तुमच्या आजूबाजूला जे चालले आहे, त्याबाबत सर्तक राहा. जमिनी काढून घेण्याची एक प्रकारची नवी ‘सहकार चळवळ’ महाराष्ट्राच्याविरोधात चालवली जात आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray
Thackeray Group News : ठाकरेंना बीडमध्ये पुन्हा धक्का; अंधारेंवर आरोप, सहसंपर्कप्रमुखांची शिंदेसेना प्रवेशाची घोषणा

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रविरोधातील ही जमिनी ओरबाडण्याची सहकार चळवळ तुम्ही ओळखली पाहिजे. आपल्याकडील नेते लाचार, मिंधे झाले आहेत. पैशाने वेडे झाले आहेत. त्यांना सत्व कळत नाही. हे नेते नुसते उड्या मारत आहेत. महाराष्ट्रातील या नेत्यांनी स्वाभिमान गहाण टाकला आहे. पण, तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण टाकू नका. तुमच्यासह सर्वांनी सतर्क राहावे.

R...

Raj Thackeray
Ram Mandir News : सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट... श्रीरामांच्या मूर्तीला सोलापुरात विणलेले वस्त्र घालणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com