Ajit Pawar : काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीकारावर अजितदादांचा भरोसा; विधानसभेची जबाबदारी देत असा आखला 'प्लॅन'

Ajit Pawar On Assembly Election : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर अजित पवार विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात येत आहे.
ajit pawar naresh arora.jpg
ajit pawar naresh arora.jpgsarkarnama

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( अजित पवार गट ) चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण, रायगडमधील सुनील तटकरे सोडता बालेकिल्ला बारामतीसह तीन ठिकाणी राष्ट्रवादीला धक्के बसले.

बारामतीतून सुनेत्रा पवार, धाराशिव येथून अर्चना पाटील आणि शिरूरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पराभवाला सामोर जावं लागलं होतं. यातच विधान परिषद आणि विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी( Ncp ) कामाला लागली आहे.

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान सोमवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक झाली. त्यात विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. त्यासह आगामी निवडणुकीत मोठा स्कोअर उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या राष्ट्रवादीनं नरेश अरोरा यांची निवडणूक रणनीतीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

ajit pawar naresh arora.jpg
Video Assembly Session : वडेट्टीवार, जाधव, पटोले सरकारवर तुटून पडले, महाजनांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं अन्...; नेमकं काय घडलं?

नरेश अरोरा ( Naresh Arora ) हे राजकीय रणनीती कंपनी Design Boxed.com चे सहसंस्थापक आहेत. त्यांनी राजस्थान, कर्नाटकसह अनेक राज्यांत काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं काम केलं आहे. सोमवारी राष्ट्रवादीच्या बैठकीला अरोरा उपस्थित होते. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं 'ब्रँडिंग' आणि रणनीतीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सादरीकरण करत अरोरा यांनी आमदारांना धडे दिले.

अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहिण, वीज माफी आणि शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय योजनांची घोषणा केली. त्या सगळ्या योजनांचा प्रचार करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. त्याशिवाय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 90 दिवसांची 'योजना' तयार करण्यात आली आहे.

पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांचं 'ब्रँडिंग' करण्यात येणार आहे. अजित पवार यांची प्रशासनावरील पकड, शब्दावर ठाम राहण्याची वृत्ती, आश्वासनं पाळण्याची सवय आणि पक्षाच्या केडरसाठी कायम उपलब्ध राहण्याचं कौशल्य या गोष्टी अधोरेखित केल्या जाणार आहेत.

ajit pawar naresh arora.jpg
Video Tejas Thackeray Dance : अंबानींच्या संगीत सोहळ्यात ठाकरेंच्या चिरंजीवाचा भन्नाट डान्स; शाहरूख अन् काजोलच्या गाण्यावर धरला ठेका

महायुती सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा, त्यांचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळतोय का ते पाहा, विकासाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रित करा, विरोधकांच्या कोणत्याही विधानावर टीका-टिप्पणी टाळाली, असा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com