Anant Ambani-Radhika Merchant Sangeet : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्याची सध्या लगबग सुरू आहे. या सोहळ्यातील एका कार्यक्रमात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी डान्स केला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ( Shivsena ) आणि भाजपकडून तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. या लग्नसोहळ्यापूर्वीचे विधी त्यांच्या मुंबईतील घरी पार पडत आहेत.
तर, बी. के. सी येथील 'मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' येथे संगीतसोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावत जोरदार थिरकल्याचं पाहायला मिळालं. राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही सोहळ्याला हजेरी लावली होती.
या सोहळ्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील 'ये लडकी हाय अल्लाह, हाय हाय रे अल्लाह' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडीओत त्यांच्यासोबत बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्री नृत्य करताना दिसून येत आहेत. मात्र, आता या व्हिडीओवरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे.
यावरून शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्या, शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना टोले लगावले आहेत. 'एक्स' अकाउंटवर ट्विट करत म्हात्रे म्हणाल्या, " अरे… अंबानींच्या लग्नातला हा बँकराऊंड डान्सर ओळखीचा दिसतोय… हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव, तेजस ठाकरे, उत्तम कला आहे एकेकाजवळ, वडील नटसम्राट, लेक नृत्यसम्राट."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.