Ajit Pawar: अर्थसंकल्पाला 'लबाडाच्या घरचं आवतन' म्हणणाऱ्या ठाकरेंना अजितदादांनी सुनावलं; दोघांमधील सांगितला फरक...

Ajit Pawar Slams Uddhav Thackeray over maharashtra budget 2024: या लोकांमध्ये अन् अजित दादांमध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे अन् तुमचा दादा काम करणारा आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
Ajit Pawar Slams Uddhav ThackeraySarkarnama

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला, त्यावर विरोधकांनी सडकून टीका केली. त्याला अजितदादांनी सडेतोड उत्तर दिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना 'हे लबाडाच्या घरचं आवतन' म्हणून हिणवलं आहे.

अर्थसंकल्प हा आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी 'एक्स'वर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला आहे

"अर्थसंकल्पावर अनेक जण अकारण टीका करीत आहेत. त्यांच्याकडून हा अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जातयं. काहींनी लबाडाच्या घरच आवतान म्हणून हिणवलं आहे. मला तुम्हाला इतकच सांगायच आहे की या लोकांमध्ये अन् अजित दादांमध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे अन् तुमचा दादा काम करणारा आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: 'लाडली बहीण'ची आर्थिक लूट करणं तलाठ्याला भोवलं; निलंबनानंतर आता गुन्हा दाखल

अर्थमंत्री अजित पवार यांनी 'एक्स'वर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरु केल्या, त्यावर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

मी कधीच पक्ष बदलेला नाही...

मी कधीच पक्ष बदलेला नाही, माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप निराधार आहे असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. माझा पक्ष हा नेहमी जनता होती. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही ही लाडकी बहीण योजना आणली आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक विवंचना दूर होतील, विरोधक तुम्हाला फूस लावतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. विकासाची गंगा तुमच्या दारात कोण आणतं, विकासाबाबत कोण बोलतंय याकडे लक्ष द्या असे अजित पवार म्हणाले. मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खोटे आरोप झाले हे आरोप भविष्यात ही सिद्ध होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com