Someshwar Sugar Factory: अमित शाह यांच्यासमोर सांगितलेला शब्द अजितदादांनी खरा केला ; 'सोमेश्वर'कडून 3350 रुपये दर जाहीर

Shri Someshwar Sahakari Sakhar Karkhana News: राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यात 'सोमेश्वर' पहिल्या क्रमांकावर आहे.
Someshwar Sugar Factory - Ajit Pawar
Someshwar Sugar Factory - Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

-संतोष शेंडकर

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच पुण्यात "माझ्या नेतृत्वाखालील एका कारखान्याचा दर ३३५० रूपये प्रतिटन निघतो," असे सांगितले होते. त्यामुळे इतका दर देणारा कारखाना कोणता,अशी चर्चा होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कार्यक्रमास उपस्थित होते.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ३३५० रूपये प्रतिटन इतका दर देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी दिली. एफआरपीपेक्षा तब्बल ५०० रूपये अधिक दर शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यात 'सोमेश्वर' पहिल्या क्रमांकावर आहे.

जेजुरी येथील सभेत अजित पवार यांनी सोमेश्वर कारखान्याची एफआरपी २८५० होती. पण तो कारखाना आम्ही चांगला चालवला आणि ३३५० रूपये प्रतिटन इतका अंतिम दर देत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा ५०० रूपये जास्त मिळणार आहेत. राज्यात काही कारखाने २३५० रूपये भाव देत आहेत, असे स्पष्ट केले.

Someshwar Sugar Factory - Ajit Pawar
PM Modi Big Statement : ठाकरेंनी युती तोडली, आम्ही नाही," ; NDA च्या बैठकीत मोदींचा पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अजितदादा म्हणाले होते की, महाराष्ट्रातले भाव जाहीर होऊद्या. एकूण भावात पहिल्या पाच कारखान्यात आमचा कारखाना असेल. त्यानुसार संचालक मंडळाने कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेत ३३५० रूपये दरावर शिक्कामोर्तब केले.

सोमेश्वरने स्वतःचाच ३३०० रूपये प्रतिटनाचा विक्रम मोडला आहे. जिल्ह्यातील माळेगाव कारखान्याचा रंजन तावरे यांच्या संचालक मंडळाचा २०१७-१८ चा ३४०० रूपये प्रतिटन दराचा विक्रम मात्र अबाधित राहिला आहे. दरम्यान, सलग पाच वर्ष प्रतिटन तीन हजारांपेक्षा जास्त दर देण्याचा मानही सोमेश्वरने पटकावला आहे.

Someshwar Sugar Factory - Ajit Pawar
Jalgaon Municipal Corporation: 'त्या' २७ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; सुनावणी पुढे ढकलली

'सोमेश्वर'ने सरत्या हंगामात १२ लाख ५६ हजार टन गाळप करून ११.९२ टक्के साखर उताऱ्यानुसार १४ लाख ६७ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली होती. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ५ कोटी युनिटची वीजविक्री केली तर डिस्टिलरी प्रकल्पातून ९१ लाख लिटर अल्कोहोल व ४१ लाख लिटर इथेनॉलनिर्मिती केली होती.

पुरूषोत्तम जगताप म्हणाले, "शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काटकसरीने कारभार केला. साखर विक्रीची उत्तम सरासरी राखल्याने चांगला दर आला. अजितदादांनी सहकारी साखर कारखानदारीवर बारकाईने लक्ष ठेवत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. आगामी हंगामासाठी गेटकेन व बिगर सभासदांशी करार करताना सभासदांप्रमाणे दर दिला जाईल. येत्या हंगामात बिगरसभासद व गेटकेनधारक 'सोमेश्वर'कडे मोठ्या संख्येने वळण्याची शक्यता आहे,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com