Sanjay Rathod : पोलिसांकडून क्लीनचिट म्हणूनच संजय राठोड मंत्रिमंडळात....

शिवसेनेतील Shivsena नाराजीविषयी ते म्हणाले, शिवसेनेत कोणीही नाराज नाही No one is offended. आपल्याकडे थोडीच मंत्रीपदे few ministerial posts होती, पुढचा टप्पा लवकरच होईल.
Eknath shinde, Sanjay Rathod
Eknath shinde, Sanjay Rathodsarkarnama

मुंबई : संजय राठोड यांना पोलिसांनी क्लिनचिट दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला आहे. यावर आणखी कोणाचे काही मत, विचार असतील तर आम्ही ते नक्की ऐकुन घेऊ, लोकशाही भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकारी आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावरून सध्या काहींनी विरोधात आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. याविषयी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून याबाबतची भूमिका जाणून घेतली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री असताना पोलिसांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्यामुळे त्यांचा या मंत्रिमंडळात समावेश केलेला आहे.

Eknath shinde, Sanjay Rathod
Satara : शंभूराज देसाईंच्या आई म्हणाल्या, त्याला मी Collector करणार होते, पण....

पोलिसांनी तपास केला होता. त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही, त्यामुळे त्यांना क्लिनचिट दिलेली आहे. यावर आणखी कोणाचे काही मत, विचार असतील तर ते नक्की ऐकून घेतले जातील. लोकशाहीत भावना व्यक्त करण्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे.

Eknath shinde, Sanjay Rathod
Jalgaon News: मंत्रीपदासाठी खानदेशच्या नेत्यांचे एकनाथ शिंदेकडे लॅाबिंग

पुढे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून सर्वसमावेशक मंत्रिमंडळ दिसेल. आमच्या सरकारकडून सर्वसामान्यांना न्याय दिला जाईल, हे सरकार लोकाभिमूख असून आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ. राज्याला केंद्राचा ही पाठींबा असून पंतप्रधान नरेंद मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मी धन्यवाद देईन.

Eknath shinde, Sanjay Rathod
राज्यपाल महोदय महाराष्ट्र द्वेषाच्या आजारातून लवकर बरे व्हा, राष्ट्रवादी पाठवणार दोन हजार पत्र

त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी चांगले निर्णय घेतला आहेत. त्यामुळे राज्याचा विकास चांगल्या गतीने होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेतील नाराजीविषयी ते म्हणाले, शिवसेनेत कोणीही नाराज नाही. आपल्याकडे थोडीच मंत्रीपदे होती, पुढचा टप्पा लवकरच होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com