Jitebdra Avhad : पोलीस ठाण्यातच एकाचा मृत्यू : पोलिसांत एवढी मग्रुरी कशाने आली? आव्हाड संतप्त

Kalyan Kolasewadi Police : घटना सीटीव्हीत कैद; मृत्यूची सीआयडी चौकशी सुरू
Bhingardive Family, Jitendra Awhad
Bhingardive Family, Jitendra AwhadSarkarnama

Police News : कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दीपक भिंगारदिवे (वय ६३) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे. दीपक यांचा फिट आल्याने मृत्यू झाला असून याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात येणार असल्याची कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ (Sachin Gunjal) यांनी माहिती दिली.

दीपक यांची पत्नी या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याविषयी एक व्हिडिओ ट्विट करून आपल संताप व्यक्त केला. त्यात त्यांनी पोलीस ठाण्यात ऐवढी मग्रुरी कशाने वाढली आहे. मुंब्राच्या खाडीत जाळे टाकले तर कायद्याची सगळी पुस्तक मिळतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी या घटनेवर दिली आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

Bhingardive Family, Jitendra Awhad
Bawankule : मूल होत नाही तेव्हा, दुसऱ्याचं मूल आणून बारसं केलं जातं; ठाकरेंचं तसंच आहे !

शुक्रवारी रात्री कोळसेवाडी पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी प्रशिक भिंगारदिवे (वय २३) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू केली. प्रशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्याचे वडील दीपक यांना मिळाली. त्यामुळे ते दुसरा मुलगा गौरव याच्यासोबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानतंर काही वेळाने पोलीस ठाण्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Bhingardive Family, Jitendra Awhad
MVA News : उदय सामंत म्हणतात, महाविकास आघाडी फुटणार; युतीत येणाऱ्या आमदारांचा आकडाच सांगितला..

दीपक हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आपल्या मुलाला का आणले, याची चौकशी करण्यासाठी गेले होते. प्रशिक याची चौकशी सुरू असताना दीपक हे त्याची व्हिडिओ शुटींग करत होते. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ठाणे अंमलदार कक्षामागे बसविले होते. काही वेळाने त्यांना फिट आल्याने ते खाली कोसळले. त्यांना त्वरीत रुग्णालयात हलविले.

Bhingardive Family, Jitendra Awhad
Rane Vs AjitDada : माझ्या फंद्यात पडू नका; नाही तर पुण्यात येऊन बारा वाजवीन : नारायण राणेंचे अजितदादांना प्रत्युत्तर

डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या सर्व प्रकरण पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहे. दीपक यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याने दीपक यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. तर पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूच खरे कारण समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याची चौकशी सीआयडीमार्फत होत आहे. सीआयडी अधिकाऱ्यांनी ठाण्याला भेट दिल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

Bhingardive Family, Jitendra Awhad
Bawankule : ...तर ठाकरेंचे फक्त ३० आणि राष्ट्रवादीचे १०० आमदार आले असते, बावनकुळेंनी सांगितले गणित !

कल्याण पूर्वेत भिंगारदिवे कुटुंबीय रहाते. दीपक भिंगारदिवे यांचा मुलगा प्रशिक हा बजाज फायनान्स कंपनीमध्ये रिकव्हरी विभागात कामास आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी प्रशिक याला ताब्यात घेत चौकशीसाठी ठाण्यात आणले. यावेळी त्याचे वडील दीपक हे पोलीस ठाण्यात आले होते.

याबाबत प्राशिकने सांगितले की, "वडील माझी विचारपूस करून माझा व्हिडिओ काढत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना मारहाण केली. त्यांना दुसऱ्या खोलीत फरफटत घेऊन गेले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलीस सांगतात की आकडी आल्याने त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांना कधीही आकडीचा त्रास नव्हता. आम्हाला न्याय हवा आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही."

Bhingardive Family, Jitendra Awhad
Kasba By-Election : धंगेकरांची उमेदवारी रद्द करा : भाजप तक्रार करणार; निवडणूक आयोगाची भूमिका काय?

दीपक यांची पत्नी नंदा या राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकारी आहेत. या प्रकरणाची दखल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेत यासंबंधी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर याविषयी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

ते म्हणाले, "पोलिसांनी पोराला ताब्यात घेतले. पोराची काळजी म्हणून बाप सोडवायला गेला. सोडविणे राहिले बाजूला, त्यांना इतके मारले की काही मिनीटांतच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे हे कोणत्या प्रकारची दादागिरी आहे? ते स्वतः गुन्हेगार नाही, पोरगा गुन्हेगार नाही. तरीही त्यांचा जीव गेला. ही मग्रुरी ठाण्यात कशामुळे आली आहे? कायदा बाजूला ठेवला आहे. कायद्याची सगळी पुस्तक मुंब्राच्या खाडीत जाळे टाकले तर मिळतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com