तुमच्याही गाड्या फोडू म्हणणाऱ्या भरत गोगावलेंना जिवे मारण्याची धमकी

Bharat Gogawale आणि त्यांचा मुलगा विकास यांनाही फोन कॉल येत आहेत.
Bharat Gogavale
Bharat GogavaleSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs Shinde : मुंबई - शिवसेनेचे बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला तर भरत गोगावले ( Bharat Gogawle ) यांना धमकीचे निनावी फोन कॉल येत आहेत. या संदर्भात भरत गोगावले यांचे चिरंजिव विकास गोगावले यांनी गावदेवी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे तक्रार दिली आहे. ( Death threat to rebel MLA Bharat Gogawle )

Bharat Gogavale
तुमच्याही गाड्या फुटतील : भरत गोगावले यांचा थेट इशारा

विकास गोगावले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील दोन दिवसांपासून मला व माझ्या वडिलांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी फोन कॉल येत आहेत. काही दिवसांपूर्वी माझे वडील आमदार भरत गोगावले यांना सुद्धा अशा प्रकारे फोन आले होते. मात्र त्यावेळी आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता पुन्हा फोन कॉल सुरू झाले आहेत, असे तक्रारीत म्हंटले आहे.

शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेली. शिवसेनेतही दोन गट तयार झाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांचेही समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे हे राज्यभर यात्रा करत आहेत. तसेच एकनाथ शिंदे हेही बंडखोर आमदारांच्या मतदार संघात दौरे करत आहेत.

Bharat Gogavale
video: भरतशेठ गोगावले यांची रोखठोक भूमिका

शिवसेनेतील बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. माजी मंत्री तथा बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर पुण्यात दगडफेक झाली. या वर काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. ही घटना होऊन दोन दिवस होत नाहीत तोच बंडखोर आमदार भरत गोगावले यांना निनावी धमकीचे फोन सुरू झाले आहेत. त्यामुळे हा सत्ता संघर्ष आता रस्त्यावर आल्याची स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com