Supriya Sule On Farmers Issue : तात्काळ दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना दिलासा द्या; सुप्रिया सुळे यांची आग्रही मागणी !

Supriya Sule On State Government : "शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे."
Supriya Sule On State Government :
Supriya Sule On State Government : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर बहुतांश ठिकाणी शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्यातल्या काही भागात तुरळक सरी वगळता बऱ्याच ठिकाणी कोरडा पडला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे की, 'राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा.' सुळे यांच्या या मागणीनंतर राज्य सरकरवर दुष्काळ जाहीर करण्याबाबत दबाव वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule On State Government :
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंवर कारवाई का केली नाही, म्हणत माहिती आयुक्तांचे मुख्य सचिवांना आदेश !

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री कार्यालयाकडे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रात जून, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे."

Supriya Sule On State Government :
Chandrakant Khaire News: खैरेंचे `लोकसभायान-६`, यशस्वीरीत्या लॅंडिंग करणार का ?

"यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. राज्यातील परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे, हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी," असे सुप्रिया सुळे यांनी आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com