
Mumbai News: राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधक घोषणाबाजी करीत आहेत. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर विधिमंडळ भवनात जात असताना यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केसरकरांना डिवचलं होते. त्यावर केसरकर संतापले आहेत. त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे कुटुंबांचा त्यांनी समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरेंना सुनावले आहे.
ठाकरे दिवसरात्र महापालिकेच्या पैशावर जगतात, मी बोलायला सुरवात केली तर पश्चाताप होईल, असा इशारा केसरकरांनी ठाकरे फॅमिलीला दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारण काय चालतेय, महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे, हे आदित्य ठाकरे यांना माहिती नाही. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे, तुमचे मुंबईवर वर्चस्व आहे तर मी अडीच वर्ष मुंबईचा पालकमंत्री होता. एकाही ठेकेदाराकडून मी एकही पैशा घेतला नाही. तुम्ही कुणाच्या विरोधात घोषणा देतात," अशा शब्दात केसरकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावले.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या आदरापोटी मी आजपर्यंत आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोललो नाही, पण ज्या दिवशी बोलायला सुरवात करेल, त्यावेळी तुम्हाला खरोखर पश्चाताप होईल, एका चांगल्या माणसाच्या विरोधात बोललो, अशी म्हणण्याची तुमची वेळ येईल, असे केसरकर म्हणाले.
केसरकर विधिमंडळ भवनात जात असताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे पाहत, शाळेच्या मुलांचे गणवेश कुठे आहे, अशी घोषणा केलीय यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले भास्कर जाधव यांना हसू आवरता आले नाही. जितेंद्र आव्हाडांसह महाविकास आघाडीतील अनेक आमदार उपस्थित होते.
ठाकरे फॅमिलीवर आरोप करणाऱ्या केसरकरांवर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ठाकरेंमुळे केसरकर यांनी मंत्रीपद मिळाले होते, केसरकर हे सावतंवाडीच्या मोती तलावावरील कावळा आहे, असा शब्दात राऊतांनी त्यांचा टीकेचा समाचार घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.