Thane News : बाळासाहेबांचे विचार जपायचे म्हणून काय तरी करायचे. गद्दार म्हणायचं, खोके म्हणायचं हे कोणीही सहन करणार नाही, आमची तीन-तीन पिढ्यांची श्रीमंती आहे. आम्हाला कोणाच्या पैशाची गरज नाही, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नाव न घेता ठाकरे पिता-पुत्रांवर लगावला.
खरा शिवसैनिक कोण आहेत तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आहेत. शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे. उगाच सांगता आमचा पक्ष चोरला अमुक केले तमुक केले. उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला ही अशी खोचट टीकाही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महायुतीच्या मेळाव्यात केली.
आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या वतीने महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर टीका केली. 'मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जर्मनीला पाठवले. तेथे सरकारसोबत वाटाघाटी केल्यावर त्यांचे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात (Maharashtra) आले होते. त्यावेळी आम्ही एक करार केला. त्यामध्ये एका वर्षात चार लाख मुलांना जर्मनीला पाठवण्याचा हा करार केला आहे. ज्यांना भारतात 35 हजार पगार मिळतो, त्यांना जर्मनीत साडेतीन लाख रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून जाणार आहे. तसेच महाराष्ट्राचा अभिमान आम्हाला आहे म्हणून आम्ही दिवस रात्र काम करतोय गद्दार म्हणून ऐकायला काम करत नाही, असाही टोला त्यांनी या वेळी लागला.
ठाण्याचा उमेदवार कोण असेल, (Lok Sabha) याबाबत सूचक विधान करत केसरकर यांनी या मेळाव्याच्या व्यासपीठावर बसलेल्या इच्छुकांपैकी एक जण उमेदवार आहे आणि तो भरघोस मतांनी निवडून येईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेचे (Shivsena) रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, भाजपचे संजीव नाईक या इच्छुकांसह शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) आणि राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Parajape) हे उपस्थित होते. त्यामुळे यापैकी एक जण उमेदवार असणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.