Deepak Kesarkar News : आता 'त्यांनी' अजित पवारांची माफी मागायला हवी; केसरकरांचा सल्ला राऊत ऐकणार का?

Deepak Kesarkar On Sanjay Raut : अजितदादा राऊतांना सोडणार नाहीत, वेळीच माफी मागावी..
Deepak Kesarkar On Sanjay Raut News
Deepak Kesarkar On Sanjay Raut NewsSarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar On Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा होत्या. यासंदर्भात बातम्याही येत होत्या. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्रातील रोखठोक सदरात याबाबत उल्लेख केला होता.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याबाबतच्या सर्व चर्चांना अजित पवारांनी (Ajit pawar) पूर्णविराम देण्यासोबतच, त्यांनी संजय राऊतांवरही टीका केली होती. यावर पुन्हा राऊतांनी अजित पवारांवर भाष्य केले होते. या दोन्ही नेत्यांच्या टीका टिपण्णीत आता राज्याचे मंत्री व शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे.

Deepak Kesarkar On Sanjay Raut News
Ajit Pawar On Sanjay Raut : तुमच्या पक्षाचं बघा; आमच्याबद्दल का बोलता? अजितदादांनी राऊतांना सुनावलं !

केसरकर म्हणाले, संजय राऊत हे अजित पवारांना नीट ओळखत नाहीत. अजितदादा जेवढे शांत दिसतात, तेवढेच ते आक्रमकही आहेत. संजय राऊतांनी शांतपणे जाऊन अजितदादांची माफी मागावी, आपल्याला वाटत नाही की, अजितदादा त्यांना सोडतील, असा सल्ला केसरकरांनी संजय राऊत यांना दिला.

Deepak Kesarkar On Sanjay Raut News
Sanjay Raut On Ajit Pawar : आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार, यामध्ये अजित पवारसुद्धा येतात; राऊतांचं प्रत्युत्तर !

काय म्हणाले होते अजित पवार?

"काही-काही तर पक्षाच्या बाहेरचे प्रवक्ते हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात. त्यांना कुणी अधिकार दिला कुणाला माहीत. ज्यावेळी पक्षाची मिटींग होईल त्यावेळी मी याबाबत विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाबद्दल सांगा ना काय सांगायचं ते. ज्या पक्षाच मुखपत्र आहे, तुम्ही त्याबाबत बोला. पण तुम्ही आम्हाला कोट करून, हे असं झालं ते तसं झालं कशाला बोलता? आम्ही भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसरं कोणी घेण्याचे काही कारण नाही'',अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना सुनावलं होते.

संजय राऊतांनी अजित पवारांना काय दिलं प्रत्युत्तर?

"अजित पवारांनी माझ्यावर टिका केली की नाही मला माहित नाही. अजित पवार यांच्याविषयीच्या बदनामीची जी मोहीम सुरू झाली होती, त्याच्यावरती मी भूमिका मांडली होती. जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पाडली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांनीही भूमिका घेतली होती. तीच भूमिका आम्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत घेतली तर त्यात चुकीचं काय? असा उलट प्रश्न असे संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com