Sudhir Mungantiwar At Baramati : अब्दुल सत्तारांनी मंत्रिमंडळ बैठकीतच सांगितले अन तातडीने बारामती दौरा ठरविला : मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

बारामती शेती, शिक्षण आणि संशोधनात भारी ठरत आहे. पण, आमचे चंद्रपूरही त्यापेक्षा भारी आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : बारामती (Baramati) शेती, शिक्षण आणि संशोधनात भारी ठरत आहे. पण, आमचे चंद्रपूरही (Chandrapur) त्यापेक्षा भारी आहे. त्यामुळे चंद्रपूरसह राज्यात शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान पाहणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, हे महाराष्ट्र सरकारचा मंत्री म्हणून आमचे काम आहे. सर्वाधिक रोजगार देण्याची क्षमता शेती उद्योगात आहे. त्या हेतूने ॲग्रीरल्चरल डेव्हलपेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, देशी गाईंचे संगोपन आदी शेती व शेतीपूरक व्यवसाय पाहण्याच्या दृष्टीने बारामती दौरा केला. हे प्रयोग राज्यभर शेतकऱ्यांसाठी राबविल्यास शेती क्षेत्रातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल, असे राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. (Abdul Sattar said in the cabinet meeting and decided to visit Baramati : Sudhir Mungantiwar)

बारामती-शारादानगर येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज आले होते. पाहणीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, सीईओ नीलेश नलावडे उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar
Ajit Pawar News : सत्यजित तांबेंच्या शपथविधीवेळी ‘एकच वादा...अजितदादा’ घोषणा : पवारांनीच सांगितले कारण...

मुनगंटीवार म्हणाले की, ‘‘बारामतीत नुकतेच पार पडलेले ‘कृषक प्रदर्शन-२०२३’ बांधावरचे संशोधनासह आधुनिक टेक्नाॅलाॅजीमुळे महाराष्ट्रभर गाजले. त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना झाल्याचे खुद्द कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. त्यामुळे बारामतीमधील शिवारात कशा पद्धतीने बांधावरचे प्रयोग करण्यात आलेले आहेत. संशोधक शेतकऱ्यांच्या यशकथा जाणून घेण्यासाठी मी राजकारणाविरहीत बारामतीचा दौरा केला. अर्थात तो दौरा फायद्याचा ठरला की नाही, हे प्रथमता चंद्रपुरात शेतीमध्ये काही नविन गोष्टी केल्याखेरीज सांगता येणार नाही.

Sudhir Mungantiwar
Narendra Modi News : तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं..; मोदींची शेरोशायरीतून राहुल गांधींवर टीका

भरड धान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशिल आहे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की,पोषण अहारात भरड धान्याचा उपयोग करणे, बियाणांची मदत करणे, जैवविविधता बोर्डाच्या माध्यमातून सकल उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे.

Sudhir Mungantiwar
Satyajeet Tambe : आमदारकीची शपथ घेताच सत्यजित तांबे पोचले थेट आझाद मैदानावर

शेती, शिक्षण आणि संशोधनात ॲग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टने मोठे काम केले आहे, त्यानुसार या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी कृषी मंत्री सत्तार यांनी स्वतःहा पुढाकार घेत असल्याचे सांगितले होते. त्याबाबत मुनगंटीवार यांनी सांगितले की, बारामतीला कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी जी कायद्याची चौकट आहे, ती तपासावी लागेल. ते झाल्यानंतर बारामतीसह जेथे आवश्यक आहे, तेथे सरकारच्या वतीने विद्यापीठाला मंजुरी मिळेल.

Sudhir Mungantiwar
Congress News : काँग्रेसमधील वाद वाढला : थोरातांची पाठराखण करत सुनील केदारांचा पटोलेंना इशारा

पंजाब, कर्नाटकने शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे, महाराष्ट्रात हा प्रयोग राबविला जाईल का, असे विचारले असता ते म्हणाले की, कर्नाटकचे माहित नाही, परंतु मोफत विजेच्या धोरणामुळे पंजाब राज्य अर्थिकदृष्टया अडचणीत आले आहे. महाराष्ट्रात मोफत वीज देण्यापेक्षा सूर्यप्रकाशाचा उपयोग होत असलेल्या सोलर सिस्टिमला प्रोत्साहन दिले जात आहे. तब्बल ५० हजार कोटींची मोठी गुंतवणूक करून सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प दरात वीज देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यापुढे शेतकरीच वीज उत्पादक कसा होईल, याकडेही सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.

Sudhir Mungantiwar
Rajan Patil News : ‘नक्षत्र’मधून वाचण्यासाठीच राजन पाटलांचा भाजप प्रवेश : विजयराज डोंगरेंनी डागली तोफ

मंत्रीमंडळ विस्तार लांबला म्हणून राज्य सरकारची प्रगती थांबली नाही, असे ठासून सांगत मुनगंटीवार यांनी जलसंपदा विभागासह शिक्षण, आरोग्य आणि मुलभूत सेवा सुविधांमध्ये सरकारने लोकहिताचे निर्णय घेतल्याचे सांगितले.

अजित पवारांना केली ही विनंती

अधिवेशनाचा कालावधी वाढविणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच महत्व सुरळीत कामकाजाला आणि लोकहिताच्या मुद्दांना दिले पाहिजे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, ही केलेली मागणी चुकीची नाही. परंतु विरोधक म्हणून त्यांनी या अधिवेशानाचा उपयोग राजकारणासाठी नव्हे; तर लोकहिताच्या चर्चेसाठी करावा. एवढीच माझी त्यांना विनंती आहे. काँग्रेसमध्ये पायातपाय घालून राजकारण करण्याची संस्कृती आहे, त्यामुळेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीमाना देण्याचा निर्णय घेतला, असाही टोला त्यांनी या वेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com