Ajit Pawar News : सत्यजित तांबेंच्या शपथविधीवेळी ‘एकच वादा...अजितदादा’ घोषणा : पवारांनीच सांगितले कारण...

तांबे यांच्या तीन पिढ्या या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या आहेत. सत्यजित तांबे यांनीही युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम पाहिले आहे.
Ajit Pawar-Satyajeet Tambe
Ajit Pawar-Satyajeet TambeSarkarnama

मुंबई : पुढील राजकीय निर्णय घेत असताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सल्ला मी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना निवडून आल्यानंतर दिला होता. कदाचित तांबे यांना निवडून आणणारे कार्यकर्ते आणि मतदारांना माझा सल्ला आवडला असेल, त्यामुळे एखादं-दुसरी घोषणा माझ्या नावाने दिली असेल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले. (Announcement in the name of Ajit Pawar during the swearing in of Satyajeet Tambe: AjitDada gave reason)

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी आज (ता. ८ फेब्रुवारी) मुंबईत विधान भवनात आमदारकीची शपथ घेतली. तांबे हे आमदारकीची शपथ घेत असताना विधान भवनात ‘एकच वादा...अजितदादा...’ अशी घोषणाबाजी झाली. त्याची चर्चा सुरू असताना खुद्द अजितदादांनीच या घोषणेबाबबत स्पष्टीकरण दिले आहे.

Ajit Pawar-Satyajeet Tambe
Satyajeet Tambe : आमदारकीची शपथ घेताच सत्यजित तांबे पोचले थेट आझाद मैदानावर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपाबाबत अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत एकदा ठरल्यानंतर, जे ठरलं आहे, त्याची सर्वांनीच अंमलबजावणी केली पाहिजे. निवडून आल्यानंतर सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे. विधीमंडळातील सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

Ajit Pawar-Satyajeet Tambe
Congress News : काँग्रेसमधील वाद वाढला : थोरातांची पाठराखण करत सुनील केदारांचा पटोलेंना इशारा

आताही विधान परिषदेत निवडून आलेल्या पाचही जणांना अभिनंदनाचे, शुभेच्छांचे पत्र पाठविले आहे. भावी वाटचालींसाठी त्यांना सदिच्छा दिल्या आहेत. सत्यजित तांबे हे एक तरुण सहकारी निवडून आलेले आहेत. ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मी आपला एक वडिलकीचा म्हणा अथवा एक सहकारी म्हणून सल्ला दिला. पुढचा निर्णय घेत असताना उद्याचे उज्ज्वल भवितव्य आणि पुढं असणारी सर्व आव्हाने लक्षात घेऊन राजकीय वाटचालीबाबत निर्णय घ्यावा, असा सल्ला मी सत्यजित यांना दिला होता.

Ajit Pawar-Satyajeet Tambe
Rajan Patil News : ‘नक्षत्र’मधून वाचण्यासाठीच राजन पाटलांचा भाजप प्रवेश : विजयराज डोंगरेंनी डागली तोफ

तांबे यांच्या तीन पिढ्या या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या आहेत. सत्यजित तांबे यांनीही युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम पाहिले आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशा शुभेच्छा मी तांबेंना दिल्या आहेत. कदाचित सत्यजित तांबे यांना निवडून आणणारे कार्यकर्ते आणि मतदारांना माझा सल्ला आवडला असेल, त्यामुळे एखादं-दुसरी घोषणा माझ्या नावाने दिली असेल, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com