Ajit Pawar News : मुंबईत महायुतीचं 'शक्ती'प्रदर्शन, मोदींचा 'रोड शो'; पण अजितदादांची दांडी; 'हे' कारण आलं समोर

PM Narendra Modi Road Show In Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 19 सभा झाल्या आहेत.नाशिक आणि कल्याणमधील सभेनंतर त्यांची 17 मे रोजी मुंबईत जाहीर सभा होणार आहे.
ajit pawar narendra modi
ajit pawar narendra modisarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष घातलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून मोदी आणि शाहांच्या प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पाचव्या टप्प्यात होत असलेल्या मतदानाच्या धर्तीवर नाशिक, कल्याणमधील सभेनंतर आता पंतप्रधान मोदींचा मुंबईत मेगा रोड शो होत आहे. पण या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

ajit pawar narendra modi
Khaire Vs Bhumre News : निवडणूक भुमरे-खैरेंची, पण टेन्शन मात्र विद्यमान अन् भावी आमदारांना!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील घाटकोपर अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीजपर्यंत असा अडीच किलोमीटरच्या 'रोड शो'चं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. या रोड शोसाठी महायुतीने कंबर कसली आहे.स्वत:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या नेत्यांनी या रोड शोसाठी जोरदार तयारी केली आहे.

पण एकीकडे महायुती या रोड शो च्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या रोड शोत दिसून आले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौथ्या टप्प्यांपर्यंत प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यांनी बीड, चाकण, शिरूर,पुणे अशा विविध ठिकाणी सभांद्वारे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.पण गेल्या दोन तीन दिवसांपासून अजित पवार प्रचारात सक्रिय नसल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यातच आता ते मुंबईतील मोदींच्या रोड शोमध्येही सहभागी होत नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.मात्र. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोदींच्या रोड शो मध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

ajit pawar narendra modi
CAA News : मोठी बातमी! सीएएद्वारे पहिल्यांदाच 14 जणांना भारतीय नागरिकता

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 19 सभा झाल्या आहेत.नाशिक आणि कल्याणमधील सभेनंतर त्यांची 17 मे रोजी मुंबईत जाहीर सभा होणार आहे.यापूर्वी त्यांचा आज भव्य रोड शो होत आहे.शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानेच भाजपसह महायुतीने मुंबईतील सहाही जागांसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

'असा' असणार 'रोड शो'!

घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू झाला आहे. तो एम जी रोडवरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्वमध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होणार आहे.

ajit pawar narendra modi
Kolhapur Lok Sabha Election : तीन उमेदवारांचा खर्च अर्धा कोटींवर, अंतिम तपासणीत धैर्यशील माने आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com