devendra fadnavis
devendra fadnavisSarkarnama

Devendra Fadnavis : ''कसब्यातला विजय महाविकास आघाडीचा विजय नाही..!''; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Kasba & Chinchwad By Election : २०२४ ला आम्ही कसबा पुन्हा जिंकू...

Devendra Fadnavis News : महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्ल्यात विजयाचा झेंडा रोवला. या विजयामुळे एकीकडे महाविकास आघाडी व काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला असून ठिकठिकाणी जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे कसब्यातील पराभवानंतर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता कसब्यातील पराभव आणि चिंचवडमधील विजयावर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, देशभरात भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं आहे. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी,जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आजचे निकाल ही २०२४ ची नांदी आहे. महाराष्ट्रात दोन जागी झालेल्या पोटनिवडणुकीत आम्हाला विजयाची अपेक्षा होती, मात्र कसबा पेठेत चांगली मतं मिळूनही आम्हाला विजय मिळाला नाही. येथे आम्ही ४५ टक्के मते घेतली आहेत असं मत देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे.

devendra fadnavis
Chinchwad By Election : बंडखोर कलाटेंचं पराभवानंतर मोठं विधान; म्हणाले,''धंगेकरांसारखा मी पण...!''

कसब्यातला विजय महाविकास आघाडीचा विजय नाही. अलिकडच्या काळात एखादा विजयही मिळाला की त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. २०२४ ला आम्ही कसबा पुन्हा जिंकू असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच त्यांना विजयाची सवय नाही मात्र, आम्ही विजयाला सरावलो आहोत असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच कसब्यातील विजय काँग्रेसचा नाही कारण काँग्रेसच्या उमेदवाराने साधे राहुल गांधी यांचे फोटोही वापरलेले नाहीत. रवींद्र धंगेकर यांच्याबाबत एक सहानुभूती होती. त्यामुळेच ते जिंकले आहेत असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

कलाटेंची बंडखोरी ही राष्ट्रवादीची रणनीती...

चिंचवड पोटनिवडणुकीतील विजय आणि राहुल कलाटेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, काही जण भ्रम पसरवत आहेत की, चिंचवडमध्ये राहुल कलाटे उभे राहिल्याने भाजप जिंकली, मात्र हे सत्य नाही. २०१९ मध्येही राहुल कलाटेंना अनेक पक्षांनी पाठिंबा देऊन उभं केलं होतं. मात्र, तेव्हा ते ३८ हजार मतांच्या फरकांनी पराभूत झाले होते.

devendra fadnavis
Chinchwad By Election Result : विजय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊंना समर्पित; जगताप कुटुंबीय भावूक

यावेळी राहुल कलाटे यांना उभं केलं कारण जी हिंदुत्ववादी मतं शिवसेनेची आहेत, ती भाजपकडे जातील म्हणून. ही राष्ट्रवादीची रणनीती होती. मात्र अश्विनी जगताप यांनी विजय मिळवून लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चिंचवड हे भाजपचेच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com