Devendra Fadanvis Meet Amit Shah : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीची शक्यता, फडणवीस करणार दिल्लीवारी !

BJP core committee meeting : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने देखील भाजपचे कडक शब्दात कान टोचले होते. राज्यात एकनाथ शिंदे, भाजप सरकार कार्यरत असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला सत्तेत सहभागी करून घेतल्याने नाराजी व्यक्त केली..
Amit Shah- Devendra Fadanvis
Amit Shah- Devendra Fadanvis Sarkarnama

Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असून भाजपचे नेते अमित शाह यांची ते भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवारांचा झालेला पराभव, काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करण्याची व्यक्त केलेली इच्छा यासह पुढील तीन ते चार महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची शाह यांच्याशी होत असलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी संध्याकाळी दिल्लीला जाणार असून ते रात्री केंद्रीयमंत्रि अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उद्या (मंगळवारी) होत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस - शाह यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला असून अनेक जागांवर महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची रणनिती नक्की कशी असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Amit Shah- Devendra Fadanvis
Ajit Pawar got Angry Over the State Government : साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेपावरून अजित पवार संतापले

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी थेट पक्षश्रेष्ठींकडे केली होती. या पदातून मुक्त करत पक्षाच्या विस्तारासाठी काम करण्याची तयारी फडणवीस यांनी दाखविली होती. त्यासाठी काही दिवसांपूर्वी ते दिल्लीत देखील गेले होते. तेथे अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी शाह यांनी फडणवीस यांना तुमचे काम सुरू ठेवा, अशा सूचना दिल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचे काम सुरू झाले आहे.

Amit Shah- Devendra Fadanvis
Mahayuti News : महायुतीत भाजपच मोठा भाऊ; शिंदे गटातील नेत्याचा स्वपक्षीयांना घरचा आहेर

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपचे (BJP) आजी-माजी खासदार, आमदार यांची एक बैठक मुंबईत पार पडली होती. त्यामध्ये विधानसभा निवडणुकींना कशा पद्धतीने सामोरे जायचे यावर चर्चा झाली होती. दिल्ली येथे मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यामध्ये अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपची रणनिती नक्की काय असावी, हे ठरविले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने देखील भाजपचे कडक शब्दात कान टोचले होते.

राज्यात एकनाथ शिंदे, भाजप सरकार कार्यरत असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला सत्तेत सहभागी करून घेतल्याने नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा मतदारांसमोर जायचे असेल तर शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महायुतीच्या माध्यमातून कसे नियोजन करावे लागेल, अशा सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com