Maratha Reservation : सरकार लवकरच सगे-सोयऱ्यांची अधिसूचना काढणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

Chandrakant Patil Information : मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत यापूर्वीच आश्वासित केले होते. त्यानुसार सरकारने अधिसूचनेवर सूचना आणि हरकती मागितल्या आहेत.
Manoj Jarange Patil-Chandrakant Patil
Manoj Jarange Patil-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 06 July : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सावध पावले उचलली जात आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारी पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबतचे भाष्य पंढरपूरमध्ये केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकार लवकरच सगे सोयऱ्यांची अधिसूचना काढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आषाढी यात्रा तयारीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आज (ता. 06 जुलै) पंढरपूरला (Pandharpur) आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सगे सोयरे याबाबत भाष्य केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकार लवकरच सगे सोयऱ्यांची अधिसूचना काढणार आहे. इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ही सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढली जाईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी पंढरपुरात बोलताना स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत यापूर्वीच आश्वासित केले होते. त्यानुसार सरकारने अधिसूचनेवर सूचना आणि हरकती मागितल्या आहेत. त्यावर जवळपास आठ लाखांहून अधिक हरकती आणि सूचना आल्या आहेत. हरकतींवर चर्चा करून लवकरच सगे-सोयऱ्यांची अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Manoj Jarange Patil-Chandrakant Patil
Manoj Jarange's Peace Rally : जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत ठाकरे गटाचे खासदार आष्टीकर सहभागी...

दरम्यान, सगे सोयऱ्यांच्या अधिसूचना काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 12 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी आजपासून मराठवाड्यात शांतता यात्रा सुरू केली आहे. जरांगे यांच्याशी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी फोनवरून चर्चा केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी आजपासून हिंगोलीतून शांतता यात्रा सुरू केली आहे.

Manoj Jarange Patil-Chandrakant Patil
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महाआघाडीचा उमेदवार पडणार; हसन मुश्रीफांचे भाकीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com