Maharashtra Political News : विधान परिषद निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे पाटील यांच्या मागे महाविकास आघाडीचा हात असल्याचे बोलले जात होते. मात्र निवडणुकीत जयंत पाटील यांना दारून पराभव झाला आहे. त्यांना फक्त 12 मते मिळाली.
महाविकास आघाडीतील 37 आमदार असलेल्या काँग्रेसने प्रज्ञा सातव, 12 आमदार असलेल्या ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, तर 15 आमदार असलेल्या शरद पवार Sharad Pawar गटाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जयंत पाटील यांची 16 मते फिक्स होती. तर विजयासाठी अधिकच्या सात मताची गरज होती. मात्र अपेक्षित मतांपेक्षाही जयंत पाटील यांना 4 तर एकूण तब्बल 11 मते कमी पडली.
महाविकास आघाडीतील शरद पवारांनी पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसने मात्र अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यास निकार दिला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्य सातव यांना 25, तर नार्वेकरांना 24 मते मिळाली. तर जयंत पाटील Jayant Patil यांना फक्त 12 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे महाविकास आघाडीने जयंत पाटील यांना दगा दिल्याचा आरोप महायुतीतील नेत्यांनी केला आह.
विधान परिषदेत महायुतीतील भाजपचे ५, शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी दोन असे नऊ उमदेवार रिंगणात होते. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस १, ठाकरे गट १ आणि शरद पवार गटाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला. यात महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला तर महाविकास आघाडीतील ३ पैकी २ उमेदवार निवडून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.