Devendra Fadnavis From Japan : जपानला गुंतवणुकीसाठी भारतच सुरक्षित वाटतो; देवेंद्र फडणवीसांनी घेतला भविष्याचा वेध

Japan And India Relation : जपान भारत देशात गुंतवणूक वाढवण्यास सकारात्मक
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Mumbai News : भारतात उद्योगांसाठी योग्य वातावरण असून देश मोठ्या गुंतवणुकीसाठी तयार आहे. जागातील इतर देशांमध्ये गुंतवणूक करावी, अशी क्षमता नाही. भारत उद्योगांसाठी अधिक सुरक्षित देश असल्याचे मत जपानच्या मंत्र्यांचे आणि मोठ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जपान भविष्यात आपल्या देशात मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहे. विविध प्रकल्पासांसाठी केंद्राच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्याची विनंती जपानकडून करण्यात आल्याची माहिती देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेतला. जपान दौऱ्यावरून परतल्यानंतर फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Latest Political News)

जपानचा दौरा सफल झाल्याचा आनंद असल्याचे सांगताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतराष्ट्रीय संबंधातून जपान आपल्या खूप जवळ आला आहे. आज जपान आणि भारताची मैत्री घट्ट बनली आहे. जपानने राज्य अतिथी म्हणून आमंत्रित केल्याने तेथील मंत्री, अधिकाऱ्यांसोबत अनेक महत्वाच्या बैठका झाल्या. या बैठकांच्या माध्यमातून देशातील गुंतवणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली."

Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar on Ajit Pawar : वडेट्टीवार म्हणतात, "अजितदादांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवारांनी हे पाऊल उचललं..

यानंतर त्यांनी प्रकल्पांची यादीच सांगितली. यात वर्सोवा ते विरार ४२ किलोमीटर सी-लिंक, सीएसटी ते वडाळा अंडरलाईन मेट्रो, टोकियोसारखे मुंबईसाठी आपत्तीव्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यासाठी जपान सहकार्य करणार आहे. यासह सेमी कंडक्टरसह इतर प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. सोनीसारख्या मोठ्या कंपन्या देशात येण्यास तयार असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

जपानला भारतच सर्वात सुरक्षित देश वाटतो. भारताची मोठी गुंतवणूक करवून घेण्याची क्षमता आहे. आता देशात येणाऱ्या गुंतवणुकीतील काही गुंतवणूक महाराष्ट्रात कशी आणता येईल, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी चर्चा करणार असल्याचेही फडवीसांनी सांगितले. त्यासाठी जॅपनीज भाषा बोलता येणारी एक मुंबईत तर दुसरी जपानमध्ये अशा दोन टीम तयार करण्यात येतील, असेही फडवीसांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Tirupati Devsthan : तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी ठाकरे-फडणवीसांचे विश्वासू सहकारी; नार्वेकरांच्या नावामुळे आश्चर्य

कोयासान विद्यापीठाने डॉक्टरेट दिल्याबद्दल फडणवीसांनी त्यांचे आभार मानले. हा महाराष्ट्राचा सन्मान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तेथे आपल्या मराठी लोकांनी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केल्याने भारावून गेलो. भरातीय दूतावासात चांद्रायान लॅडिंग मराठी लोकांसोबत पाहिला. त्यावेळी त्यांनी जपानमध्ये भारत जागा केल्याची आठवणही फडणवीसांनी सांगितली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com