BJP News : फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांवर भाजप हायकमांड सोपवणार मोठी जबाबदारी...

Mumbai BJP News : मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचे केंद्रीय गृहमंत्री तथा वरिष्ठ नेते अमित शाह यांचे टार्गेट असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडविण्याचा निर्धार अनेकदा बोलून दाखवला आहे.
Praveen Darekar
Praveen Darekar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 29 June : महाराष्ट्र भाजपमध्ये येत्या दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडणार असून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एक जुलै रोजी स्वीकारणार आहेत. तसेच, मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्या नेत्याची नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महायुती सरकारमध्ये मुंबई भाजपचे (Mumbai BJP) अध्यक्ष आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षातील एक व्यक्ती एक पद या नियमानुसार शेलार यांच्या जागी मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून नव्या व्यक्तीची नियुक्ती होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेलार हे मंत्री असल्याने त्यांना मुंबई पालिका निवडणुकीत पूर्णवेळ काम करता येणार नाही, त्यामुळे मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपकडून स्वतंत्र नेत्याची वर्णी लावण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका (Mumbai Corporation) निवडणूक जिंकण्याचे केंद्रीय गृहमंत्री तथा वरिष्ठ नेते अमित शाह यांचे टार्गेट असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनीही मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडविण्याचा निर्धार अनेकदा बोलून दाखवला आहे, त्यामुळे भाजपकडून जोरदार रणनीती आखली जात आहे, त्यातून मराठा चेहरा असलेल्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

आशिष शेलार यांच्या जागी मुंबई भाजपच्या अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असणारे प्रवीण दरेकर (Praveen Darekar ) यांचे नाव निश्चित झाल्याचे माहिती आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पूर्ण वेळ देणारा अध्यक्ष देण्याचा निर्णय भाजप हायकमांडने घेतला आहे, त्यामुळे शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाची कमान विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

प्रवीण दरेकर विधान परिषदेतील भाजपचे आमदार असून ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुराही गेल्या काही दिवासंपासून सुरू आहे. दरेकर हे फडणवीसांचे मुंबईमधील अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

Praveen Darekar
Maharashtra Politic's : ‘मला कृषिमंत्रिपद नको, इतर कोणतंही खातं द्या; दादा भुसेंचा आग्रह होता’ : आदित्य ठाकरेंचा दावा

मूळचे शिवसैनिक; मनसेचे आमदार

प्रवीण दरेकर हे मूळचे शिवसैनिक होते. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ते शिवसेनेत काम करत होते. मात्र, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर ते मनसेकडून मुंबईतील मागाठाणे मतदारसंघातून ते निवडून आले. पुढे ते २०१० मध्ये मुंबई बॅंकचे अध्यक्ष होते, तेव्हापासून ते या पदावर कायम आहेत.

भाजपत प्रवेश

पुढे २०१४ मध्ये ते मनसेच्या तिकिटावर पराभूत झाले. त्यानंतर अवघ्य वर्षभरात म्हणजे २०१५ मध्ये त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. दरेकर हे वर्षभरातच भाजपकडून विधान परिषदेवर गेले. ते माध्यमांमध्ये भाजपची बाजू प्रभावीपणे मांडतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

Praveen Darekar
Dada Bhuse Politics : राज ठाकरेंची समजूत काढायला गेलेले मंत्री दादा भुसे एकाकी; 'हिंदी'च्या मुद्यावर चलबिचल

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते केले. त्यावेळी दरेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. प्रवीण दरेकर हे मंत्रिपदासाठीही इच्छुक होते. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेता आले नाही, त्यामुळे दरेकर यांना मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. याबाबतची घोषणा रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेसोबत होते की दरेकर यांच्या नियुक्ती घोषणा स्वतंत्रपणे होते, हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com