Devendra Fadnavis : 'सीएम' फडणवीसांचा शिंदेंना मोठा झटका? मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी मंगेश चिवटेंकडून काढली

Mangesh Chivate Removed from Medical Assistance Chief Post : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्रि‍पदाचा घोळ अद्यापही कायम आहे. पण दुसरीकडे फडणवीसांनी प्रशासकीय विभागातील आपल्या 'फेव्हरेट टीम'साठी बदलांचा धडाकाच लावला आहे.
Devendra Fadnavis | Eknath Shinde
Devendra Fadnavis | Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत दमदार यश मिळवून महायुती पुन्हा एकदा सत्तेत परत आली आहे.पण यावेळी मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंऐवजी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली.यानंतर फडणवीसांनी प्रशासकीय विभागात मोठे बदलाचे संकेत देताना मुख्य सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांना आपल्या टीममध्ये परत आणलं आहे.

याचदरम्यान,आता एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कौतुकाचा आणि अडचणीत असलेल्या सर्वसामान्यांसाठी 'संजीवनी' ठरलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एकनाथ शिंदेंचे खास असलेल्या मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षावरुन हटवण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तत्काळ आपल्या पदाचा पदभार स्विकारला होता.एकीकडे मंत्रि‍पदाचा घोळ अद्यापही कायम असताना दुसरीकडे फडणवीसांनी प्रशासकीय विभागातील बदलांचा धडाकाच लावला आहे. रामेश्वर नाईक यांची वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीची घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde
Parbhani Violence : जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड; परभणीत जमावबंदीचे आदेश, इंटरनेटही बंद!

महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत डॉ.रामेश्वर नाईक यांच्याकडे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नाईक हे भाजपचे नेते व गिरीश महाजन यांचे विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात.नाईक यांच्याकडे आरोग्यविभागासह प्रशासनातल्या विविध पदांवर काम करण्याचा अनुभव आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात रामेश्वर नाईक यांची वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नाईक यांनी धर्मादाय संस्थांचे सल्लागार आणि विश्वस्त म्हणून कार्यरत होते. वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी आणि धर्मादाय संस्थांच्या अखत्यारीत असलेल्या रुग्णालयांच्या नियमावली करणार्‍या हेल्प डेस्कचे प्रमुखपदावर कार्यरत होते. त्यांनी आत्तापर्यंत शंभरहून अधिक वैद्यकीय शिबिरे घेतली आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : भावांचे शपथविधी पार पडताच लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, 15 हजार अर्ज बाद

या शिबिरांद्वारे रामेश्वर नाईक यांनी कुपोषण निर्मूलन,अवयवदान,ब्रेस्ट कॅन्सर, मोतीबिंदू व रक्तदानाविषयी समाजातील जनजागृतीवर भर दिला.तसेच हजारो गरजवंत रुग्णांवर या शिबिरांत उपचार करण्यात आले होते.त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

चिवटेंमुळे सहाय्यता कक्षाला मोठी ओळख...

मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.त्यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळवून देण्यात चिवटे यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांनी अत्यंत प्रभावीपणे या कक्षाची वेगळी ओळख मिळवून दिली. पण महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये आता चिवटेंऐवजी फडणवीस यांनी डॉ.रामेश्वर नाईक यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com