Ladki Bahin Yojana : भावांचे शपथविधी पार पडताच लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, 15 हजार अर्ज बाद

Maharashtra CM Ladki Bahin Yojana Concerns : महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता खाते वाटपाची लगबग सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचीं चिंता वाढली आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Ladki Bahin Yojana
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Dec : विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झाला आहे. शपथविधी पार पडल्यानंतर आता खाते वाटपाची लगबग सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचीं चिंता वाढली आहे.

कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पुणे जिल्ह्यातील तब्बल 15000 बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आपलाही अर्ज बाद होणार नाही ना? अशी चिंता राज्यभरातील बहिणींना लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी लागू केली. ही योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी मोठ्या प्रमाणात या योजनेवर टीका केली होती.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Ladki Bahin Yojana
Parbhani Riot News : माथेफिरूकडून संविधान प्रतिकृतीची विटंबना, परभणीत दंगल उसळली!

तरी देखील महायुतीच्या (Mahayuti) तत्कालीन सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून पैसे जमा केले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड असं यश मिळालं आणि या यशामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा असल्याचे देखील सरकारमधील नेत्यांनी मान्य केलं आहे.

मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर योजनेसाठीच्या प्रलंबित अर्जांची छाननी करण्यात येत आहे या छाननी मध्ये आता पर्यंत 9 हजार 814 इतके अर्ज काही त्रुटींमुळे बाद झाले आहेत.तर 5 हजार 724 अर्जामध्ये किरकोळ त्रुटी आढळल्याने त्यांचे तात्पुरत्या स्वरुपात अर्ज नाकारले आहेत. असे एकूण तब्बल 15000 अर्ज बाद करण्यात आले आहेत.

मात्र यातील किरकोळ चुका असलेल्या अर्जदारांना त्या चुका सुधारण्याची संधी देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरच्या शेवटच्या मुदतीपर्यंत पुणे जिल्हा प्रशासनाकडे 21 लाख 11 हजार 946 इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील तब्बल लाखभर अर्जाची छाननी बाकी होती.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Ladki Bahin Yojana
BJP Politics : भाजप 'मविआ'चे खासदार फोडणार? 'ऑपरेशन लोटस'ची राऊतांना धास्ती तर बावनकुळेंनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले...

ती छाननी आता अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातून 20 लाख 84 हजार 364 इतक्या बहिणी लाडक्या ठरल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडे अद्याप 12 हजार अर्ज प्रलंबित असून त्यांची छाननी बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 99.43 टक्के अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. त्यासोबतच छाननी झालेल्या अर्जापैकी 69 हजार 175 इतके अर्जाचे बँकेच्या खात्याशी आधार सल्गन करणे बाकी आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com