Fadnavis Vs Thackeray : '...म्हणून उद्धव ठाकरेंना भगवा ध्वज फडकं वाटू लागलाय' ; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात!

BJP Vs Shivsena : '...त्यामुळे नकली शिवसेना हा उल्लेख योग्य आहे.'असंही फडणीस यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama

Loksabha Election 2024 : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भगवा ध्वज हा गुरू म्हणून स्वीकारला आहे. भगवा ध्वज हा प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवरायांचाही होता. मात्र, उद्धव ठाकरे यांना भगवा ध्वज हा फडकं वाटू लागला असून, सध्या त्यांच्या विचारांवर हिरवं सावट तयार झाले आहे. त्यांना भगवं पाहवत नसून, काही काळानंतर शिवसेनेचा ध्वजही फडकं वाटू लागेल.' अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर भाजपाचे आमदार संजय केळकर, खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपाचे ठाणे लोकसभा प्रभारी अधिकारी जयप्रकाश ठाकूर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, मनसेचे अभिजित पानसे, आरपीआयचे भास्कर वाघमारे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : ठाकरेंचा जबरदस्त कॉन्फिडन्स; मोदींना दिलं आघाडीच्या पंतप्रधान शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण!

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्याकडून भारताच्या पुढील 25 वर्षांच्या भविष्याची दिशा सांगितली जात आहे. तर महायुतीच्या नेत्यांकडून व्हिजनवर बोलले जाते मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिव्यांपासून सुरू होऊन शिव्यांपर्यंत बोलले जाते.'

याचबरोबर 'नकली शिवसेना बोलल्यावर मिरची लागली. परंतु, तुमचे वागणे तसेच असून, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जनाब असा उल्लेख केला जाऊ शकतो का?, टिपू सुलतान झिंदाबाद असे शिवसैनिक म्हणू शकतात का?, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असतानाही याकूब मेमनची कबर कशी सजवली गेली?, मुंबई बॉंम्बस्फोटातील आरोपी हा शिवसेना प्रचारक होऊ शकतो का?, पाकिस्तानचे झेंडे वापरून `व्होट जिहाद'ची मागणी केली गेली. त्यामुळे नकली शिवसेना हा उल्लेख योग्य आहे.', असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
BJP Vs Shivsena News: ठाकरेंची फडणवीसांवरील 'ती' टीका भाजपला चांगलीच झोंबली, आशिष शेलार म्हणाले...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात, तुम्ही होऊ शकत नाही, असे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले.

ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही `अजेय' आहे. काही अपवाद वगळता 14 पैकी 12 वेळा भाजपाने विजय मिळविला. या भागातील मतदार देशभक्त व राष्ट्रभक्त असून, त्यांच्यापर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोहचावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com